Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covid 19: रुग्णाला एकाचवेळी कोरोना आणि म्युकरमायकोसिसची लागण होऊ शकते का?

म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून हवेतूनही त्याचा प्रसार होऊ शकतो. सध्याच्या घडीला तरी याचा प्रसार रोखण्याचे तितकेसे प्रभावी मार्ग उपलब्ध नाहीत. | Coronavirus mucormycosis

Covid 19: रुग्णाला एकाचवेळी कोरोना आणि म्युकरमायकोसिसची लागण होऊ शकते का?
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 9:01 AM

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात अक्षरश: थैमान घातले आहे. हजारो लोक दररोज कोरोनामुळे मृत्युमुखी पडत आहेत. सध्याच्या घडीला भारत हा सर्वाधिक कोरोना (Coronavirus) रुग्ण असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. रुग्णांच्या प्रचंड संख्येने देशातील आरोग्यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली आहे. अशातच आता एक नवे संकट भारतासमोर उभे ठाकले आहे. कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना आता म्युकरमायकोसिस (mucormycosis) या घातक रोगाची लागण होताना दिसत आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. (Can you get covid 19 and black funges disease together)

म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी या नावाने ओळखला जाणारा हा आजार कोरोनापेक्षाही भयंकर आहे. त्यामुळे आता अनेकजण कोरोना आणि म्युकरमायकोसिसची एकाचवेळी लागण होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

कोरोना आणि म्युकरमायकोसिसची एकाचवेळी लागण होऊ शकते का?

वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोना आणि म्युकरमायकोसिसची एकाचवेळी लागण होऊ शकते. ज्या कोरोना रुग्णांची प्रकृती अतिश्य गंभीर असेल किंवा ज्यांना एडस् आणि डायबेटीस यासारख्या सहव्याधी असतील त्या रुग्णांना कोरोना आणि म्युकरमायकोसिस एकाचवेळी होऊ शकतो. तसे झाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते.

मात्र, सध्या भारतात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होताना दिसत आहे. म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून हवेतूनही त्याचा प्रसार होऊ शकतो. सध्याच्या घडीला तरी याचा प्रसार रोखण्याचे तितकेसे प्रभावी मार्ग उपलब्ध नाहीत. केवळ योग्य वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.

म्युकरमायकोसिसची लक्षणे कोणती?

* ताप * सर्दी * नाकातून सतत पाणी वाहणे * डोकेदुखी * श्वास घेताना त्रास जाणवणे

कोरोनासोबत तुम्हाला आणखी कोणत्या बुरशीजन्य आजारांची लागणही होऊ शकते?

कोरोनासोबत तुम्हाला आणखी काही बुरशीजन्य आजारांची लागण होऊ शकते. बुरशीजन्य आजाराचे साधारणत: एस्पेरगिलोसिस (Aspergillosis) आणि कॅनडिडायसिस (candidiasis) असे दोन प्रकार असतात. हवेतील बुरशी शरीरात गेल्यास या आजारांची बाधा होते.

एस्पेरगिलोसिस– एस्पेरगिलोसिस हा फुफ्फुसांचा आजार आहे. माती आणि झाडांवर आढळणारी बुरशी शरीरात गेल्यास या आजाराची लागण होऊ शकते.

इन्वासिव्ह कॅनडिडायसिस– कँडिडा बुरशीमुळे हा आजार होऊ शकतो. अँटीबायोटिक्स औषधे घेऊनही तुमचा ताप किंवा सर्दी जात नसेल तर तुम्हाला या आजाराची बाधा झाल्याची शक्यता आहे.

म्युकरमायकोसिस– हवेत असणाऱ्या काळ्या बुरशीमुळे या आजाराची लागण होऊ शकते. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या किंवा सहव्याधी असलेल्या लोकांना म्युकरमायकोसिसची लागण होण्याची शक्यता जास्त असते.

(Can you get covid 19 and black funges disease together)

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.