Corona Vaccine | काऊंटडाऊन सुरु, देशभरात कोरोना लसीकरणाची तारीख ठरली

डीसीजीआयकडून लसींना मंजुरी दिल्यानंतर 10 दिवसांमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. Health Ministry Corona Vaccination

Corona Vaccine | काऊंटडाऊन सुरु, देशभरात कोरोना लसीकरणाची तारीख ठरली
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 5:31 PM

नवी दिल्ली: भारताच्या औषध महानियंत्रकांकडून (डीसीजीआय) कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आरोग्य मंत्रालयानं डीसीजीआयकडून लसींना मंजुरी दिल्यानंतर 10 दिवसांमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात होईल, असे सांगितले. (Central Health Ministry informs corona vaccination started till 13 January)

डीसीजीआयने 2 आणि 3 जानेवारीला लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली होती. त्यानंतर म्हणजेच 13 जानेवारीपूर्वी कोरोना लसीकरणाला सुरुवात केली जाऊ शकते. राजेश भूषण यांनी 28 आणि 29 डिसेंबरला देशातील पंजाब, आंध्र प्रदेश, गुजरात आणि आसाम राज्यात कोरोना लसीकरणाचे ड्रायरन आयोजित करण्यात आले होते, असं सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आरोग्य विभागातील कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केले. सैन्य दल आणि पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांना कोवीन अ‌ॅपवर नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. सामान्य व्यक्तींना कोरोना लसीसाठी नोंदणी करावी लागेल.

देशात चार ठिकाणी लसीचा साठा

मुंबई, कर्नाल, चेन्नई आणि कोलकातामध्ये या चार प्रमुख ठिकाणांवर कोरोना लसीकरणाचा साठा केला जाणार आहे. त्यानंतर 37 पुढील टप्प्यात लसीकरण ठिकाणांवर लस साठवली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली. लसीच्या वाहतुकीसाठी विमानसेवेचा वापर केला जाणार आहे.

दोन डोस देणार

मंजुरी देण्यात आलेल्या दोन्ही व्हॅक्सिन पूर्णपणे सुरक्षित असून त्यांचा आपत्कालीन वापर केला जाऊ शकणार आहे. तसेच रुग्णाला दोन्ही इंजेक्शनचे दोन-दोन डोस घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे त्याचा अधिक परिणाम होणार असल्याचं डीसीजीआयने स्पष्ट केलं आहे.

5 कोटी डोस तयार

ऑक्सफर्ड-अ‌ॅस्ट्राजेनिकाच्या कोव्हिशिल्डच्या उत्पादनाचं काम सीरम इन्स्टिट्यूटला मिळेलालं आहे. सीरमच्या दाव्यानुसार कोरोनाच्या नव्या संसर्गावरही ही व्हॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे. कोरोना संसर्गात फारसा बदल झालेला नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळेच ही व्हॅक्सिन अधिक परिणामककारक ठरण्याची शक्यता आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी यापूर्वीच या व्हॅक्सिनचे 5 कोटी डोस तयार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस टोचली जाण्याची शक्यता आहे.

लसीची किंमत?

सीरमने खासगी कंपन्यासाठी या लसीची किंमत प्रति डोस एक हजार रुपये ठेवली आहे. तर भारत सरकारला 200 रुपयात एक डोस देण्यात येणार आहे. म्हणजे या व्हॅक्सिनच्या दोन डोसची किंमत 400 रुपये असणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही किंमत आकारली जाणार नाही. शिवाय देशातील गोरगरीबांनाही ही लस मोफत मिळावी म्हणून केंद्राकडून लवकरच काही घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान,  अजून एका भारतीय लसीने आपत्कालीन वापरासाठीची मंजुरी मिळवण्याच्या दृष्टीने आणखी एक यशस्वी पाऊल टाकलं आहे. झायडस कॅडिला या कंपनीच्या जायकोव-डी या लसीच्या अंतिम ट्रायलला (ह्युमन ट्रायलला) परवानगी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

सीरम आणि भारत बायोटेकच्या वादावर पडदा, दोन्ही संस्थांचा लसनिर्मितीसाठी काम करण्याचा निर्धार

Corona Vaccine | लस श्रीमंतांना परवडेल, पण गरिबांचं काय? राजेश टोपेंचा सवाल

सरकारने सीरम लसीसाठी केली 6.6 कोटींची डील, 200 रुपयांना मिळणार एक डोस

(Central Health Ministry informs corona vaccination started till 13 January)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.