Cervical cancer मुळे दर 8व्या मिनिटाला होतो एक महिलेचा मृत्यू

सर्व्हिकल कॅन्सर हा जगभरातील महिलांमधील दुसरा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. हा कॅन्सर ह्यूमन पॅपिलोमा या व्हायरसमुळे होतो.

Cervical cancer मुळे दर 8व्या मिनिटाला होतो एक महिलेचा मृत्यू
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 3:19 PM

नवी दिल्ली – जगभरात कॅन्सरच्या (cancer) केसेस दरवर्षी वाढत आहेत. त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. कॅन्सर अनेक प्रकारचे असतात. यात ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हिकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) (cervical cancer) याची सर्वाधिक प्रकरणे महिलांमध्ये आढळतात. भारतातील दर 53 पैकी एक महिला (woman) या कॅन्सरने ग्रस्त आहे. मात्र, या कॅन्सरची बहुतेक प्रकरणे प्रगत अवस्थेत नोंदवली जातात. लक्षणांबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे हे घडते.

भारतात सर्व्हिकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी लस देखील उपलब्ध आहे. ही लस ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) च्या प्रतिबंधासाठी आहे. त्यामुळे लसीकरणानंतर सर्व्हिकल कॅन्सर होण्याची शक्यता फारच कमी असते. मात्र हा कॅन्सर नेमका कसा होतो हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

सर्व्हिकल कॅन्सर म्हणजे काय ?

हे सुद्धा वाचा

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सर्व्हिकल कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखापासून सुरू होणारा कॅन्सर आहे. जगभरातील महिलांमध्ये हा दुसरा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. हा कॅन्सर ह्यूमन पॅपिलोमा या व्हायरस अथवा विषाणूमुळे होतो. जगभरातील सर्व्हिकलच्या 25% प्रकरणांमध्ये भारताचा वाटा आहे. अंदाजे दर 47 मिनिटांनी एका महिलेला सर्व्हिकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) झाल्याचे निदान होते. देशात दर आठ मिनिटाला एका महिलेचाही यामुळे मृत्यू होतो. दरवर्षी या कॅन्सरच्या केसेसमध्ये वाढ होत असून ही अतिशय चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत त्यापासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.

कसे होतात उपचार ?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सर्व्हिकल कॅन्सरवर उपचार करता येतात. त्याचा प्रतिबंध केवळ किशोरावस्थेतच (पौगंडावस्थेत) करता येतो. सर्व्हिकल कॅन्सरची लस HPV लस या कॅन्सरचा धोका कमी करू शकते. स्त्रियांमधील संसर्ग रोखण्यासाठी ही (लस) अत्यंत प्रभावी ठरते. त्याशिवाय स्मीअर टेस्ट करूनही तुम्ही सर्व्हिकल कॅन्सरचा धोका कमी करू शकता. मात्र त्यासाठी महिलांना सर्व्हिकल कॅन्सरपासून बचावाबाबत माहिती मिळणे व माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. एचपीव्ही लस 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना देता येऊ शकते. या लसीमुळे भविष्यात कॅन्सर होण्याची शक्यता फारच कमी असते.

ही आहेत सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणे

– ओटीपोटात सतत वेदना होणे

– खासगी भागातून स्त्राव होणे

– शारीरिक संबंधांदरम्यान खूप वेदना होणे

– मासिक पाळी सुरू नसतानाही रक्तस्त्राव होणे

– लघवी करतान त्रास होणे व जळजळ होणे.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.