Health : वातावरण बदलतंय | आजारी पडण्यापासून वाचायचं असेल तर संध्याकाळी हे 3 पदार्थ खाणं टाळा, जाणून घ्या!

या दिवसांमध्ये आपण अनेक वेगवेगळे पदार्थ खात असतो. पण काही असे पदार्थ असतात जे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला हानी पोहोचू शकते. तर आता आपण काही अशा पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत जे खाणे टाळले पाहिजे. जेणेकरून तुम्हाला गंभीर समस्यांच्या सामना करावा लागणार नाही.

Health : वातावरण बदलतंय | आजारी पडण्यापासून वाचायचं असेल तर संध्याकाळी हे 3 पदार्थ खाणं टाळा, जाणून घ्या!
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 10:11 AM

मुंबई : सध्या हवामानात अचानक बदल होत आहेत. बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजार पसरताना दिसत आहेत. त्यामुळे बहुतेक लोक मोठ्या प्रमाणात आजारी पडताना दिसत आहेत. मग सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू  मलेरिया अशा अनेक आजारांचा सामना लोकांना करावा लागत आहे. तसेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. त्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. तर या बदलत्या वातावरणाच्या दिवसांमध्ये संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी योग्य तो आहार घेणं खूप गरजेचे आहे.

बदलत्या वातावरणामध्ये तुमच्या आहारात काकडीचा समावेश करू नका. कारण काकडी खाल्ल्यामुळे पोट थंड होते, त्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकल्याचा त्रास निर्माण होऊ शकतो. तसेच संध्याकाळच्या वेळी काकडी खाणे टाळावे नाहीतर तुम्हाला खोकल्याची समस्या निर्माण होऊ शकते. तर संध्याकाळच्या वेळी जास्तीत जास्त गरम पदार्थ खा.

सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये बहुतेक लोक संध्याकाळच्या वेळी दही खातात. काही लोक कोशिंबीर, रायता मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात. पण हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाहीये. संध्याकाळच्या वेळी दही खाल्ल्यामुळे सर्दी, खोकला, कफ या समस्या निर्माण होतात. तसेच तुम्हाला फुफ्फुसाशी संबंधित समस्या देखील निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही दुपारी दही खा पण संध्याकाळच्या वेळी दही चुकूनही खाऊ नका.

नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण या बदलत्या वातावरणामध्ये नारळ पाणी पिऊ नका. संध्याकाळच्या वेळी तर चुकूनही नारळ पाणी पिऊ नका. कारण आता हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि ह्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा नाही तर उबदार वाटणे आवश्यक असते. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही नारळ पाणी पिऊ नका, नाहीतर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास निर्माण होऊ शकतो.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.