Child Care : सरता हिवाळा, मुलांची तब्येत सांभाळा ! मुलं आजारी पडल्यास करा हे घरगुती उपाय

हिवाळा आता कमी होत असून अशा वेळी मुलांना खोकला, सर्दी किंवा ताप येण्याची समस्या उद्भवू शकते. वातावरणातील बदलामुळे मुलं सहज आजारी पडू शकतात. काही घरगुती उपायांनी तुम्ही मुलांचा सर्दी-खोकल्यापासून बचाव करू शकता.

Child Care : सरता हिवाळा, मुलांची तब्येत सांभाळा ! मुलं आजारी पडल्यास करा हे घरगुती उपाय
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 10:29 AM

नवी दिल्ली : उत्तर भारतासह देशातील बहुतांश भागात थंडी (winter) हळूहळू कमी होत आहे. हवामानातील बदलाचा सर्वात जास्त परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. थंडीचा ऋतू जात असताना मुलांमध्ये खोकला, सर्दी किंवा ताप (cough, cold and fever) यांसारखे विषाणूजन्य आजार होऊ शकतात. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, मुलं कोणतीही तयारी न करता घराबाहेर पडतात आणि या काळात हवामान आणि त्यांच्या शरीराचे तापमान वेगळे असते. बदलत्या तापमानामुळे मुले काही वेळातच विषाणूची (bacteria) शिकार होतात आणि आजारी पडतात. मात्र काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही मुलांचा सर्दी-खोकल्यापासून बचाव करू शकता. त्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्तीही खूप वाढते.

आल्याचा रस

आलं हे आपण रोजच्या आहारात खातोच. आल्याच चहा प्यायल्याने ताजेतवाने वाटते व सर्दीचा त्रासही कमी होतो. तसेच पोट, छाती आणि घशाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आल्याच्या रसाची मदत घेऊ शकता. आल्याच्या रसामध्ये असे अनेक घटक आढळतात ज्यामुळे काही क्षणात या समस्यांपासून आराम मिळतो. त्याची चव थोडी उग्र असते, म्हणून थोडा मध मिसळून आल्याचा रस मुलांना प्यायला द्यावा. हा उपाय दिवसातून तीन वेळा केल्यास त्रास हळूहळू कमी होईल.

हे सुद्धा वाचा

जायफळाचा वापर ठरेल उपयोगी

थंडी छातीत साचून राहिल्याने मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ शकतो. त्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही जायफळाचा वापर करू शकता. जायफळाचा प्रभाव गरम असतो आणि गेल्या अनेक शतकांपासून त्याचा औषध म्हणूनही उपयोग केला जातो. मोहरीच्या तेलात जायफळ गरम करून मुलांच्या छातीवर आणि पायाच्या तळव्यावर लावा. मात्र हा उपाय केवळ रात्रीच करायचा असतो, हे नक्की लक्षात ठेवा.

हळदीचे दूध ठरते गुणकारी

बदल्या वातावरणामुळे मुलांना सर्दी-खोकल्याचा त्रास झाल्यास हळदीचे दूध पिणे हा अतिशय उत्तम उपाय ठरतो. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, हे तर तुम्हाला माहीत असेलच तसेच दूध हेही पूर्णान्न मानले जाते. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल व अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे हळदीचे दूध पिणे हेही उपयोगी ठरते. हळदीमध्ये भेसळ होण्याची भीती असल्यास कच्च्या हळदीचे दूध बनवून मुलांना प्यायला द्यावे. तसेच लसूण मोहरीच्या तेलाने मसाज करणे हा देखील सर्दीपासून मुक्त होण्याचा एक चांगला मार्ग आहे.

अशा काही उपायांनी तुम्ही सर्दी-खोकल्याचा त्रास दूर करू शकता.

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.