आता व्हॉट्सॲपवरूनच चेक करा ट्रेनचे लाइव्ह स्टेटस आणि PNR
Check PNR and Train live Status : व्हॉट्सॲपद्वारे ट्रेनचे लाइव्ह स्टेटस आणि पीएनआर नंबर आता मिळू शकतो. त्यासाठी एक सोपी प्रोसेस फॉलो करावी लागेल.
नवी दिल्ली : आजकाल, बहुतांशी युजर्स त्यांची सर्व कामं ऑनलाइन (online) करत असतात. बँकेत पैसे भरायचे असोत वा कुठलं पेमेंट करायचं असेल, सगळ्या गोष्टी चुटकीसराशी ऑनलाइन होऊन जातात. तसेच इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपचा (whatsapp) वापरही खूप वाढला असून ते आता केवळ मेसेजिंग किंवा व्हिडीओ कॉलिंगसाठी राहिले नसून त्याद्वारेही आपण आता पेमेंट करू शकतो. पण तुम्हाला कोणी सांगितले की आता ट्रेनची माहिती (train status) आणि PNR हे थेट मेसेजिंग ॲपद्वारे फोनवरच मिळवता आले तर तुमचा विश्वास बसेल का ? हे आतासहज शक्य आहे.
खरंतर आता व्हॉट्सॲपने आपल्या युजर्सच्या अथवा वापरकर्त्यांच्या सोयीसाठी अनेक फीचर्स आणली आहेत. यापैकीच आणखी एक फीचर, ते म्हणजे IRCTC ची प्रत्येक माहिती व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नंबरवर मिळवू शकता.
यूजर्स व्हॉट्सॲपवर IRCTC च्या Railofy Chatbot सेवेवरून सर्व माहिती मिळवू शकतात. चला तर मग, WhatsApp द्वारे PNR आणि थेट ट्रेनचे स्टेटस कसे तपासावे, ते जाणून घेऊया.
व्हॉट्सॲपवर PNR आणि लाईव्ह स्टेटस कसे करावे ?
तुम्ही व्हॉट्सॲपवर PNR आणि थेट ट्रेन स्टेटस सहज तपासू शकता. IRCTC च्या Railofy AI चॅटबॉटद्वारे, तुम्ही थेट ट्रेनची स्थिती पाहू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या WhatsApp वर एका स्टेशनच्या आधी किंवा पुढील येणाऱ्या स्टेशनची माहिती मिळवू शकता. यासाठी, तुम्ही प्रोव्हाईड केलेला 10 अंकी फोन नंबर सेव्ह करू शकता आणि तो IRCTC च्या AI चॅटबॉटवर पाहू शकता.
या नंबरवरून मिळवा PNR आणि लाईव्ह स्टेटस
जर तुम्हाला पीएनआर तपासायचा असेल आणि व्हॉट्सॲपवर लाइव्ह स्टेटस चेक करायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही आधी व्हॉट्सॲपवर रेलॉफी एआय चॅटबॉट (Chatbot) वापरला पाहिजे. यासाठी तुमच्या फोनमध्ये IRCTC ने दिलेला +919881193322 नंबर सेव्ह करा. नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्ही व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये हा नंबर सर्च करू शकता. आता येथे तुम्ही AI चॅटबॉटशी कनेक्ट व्हाल. येथे तुम्ही पीएनआर क्रमांक टाका आणि ट्रेनची थेट स्थिती, ती कोणत्या स्थानकावर पोहोचली आहे, किंवा किती लेट आहे, हे सर्व तपासू शकता. त्याशिवाय जर तुम्हाला जेवण ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही IRCTC Zoop या ॲपवरून जेवण ऑर्डर करू शकता. म्हणजेच आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही किंवा ट्रेनमधून स्टेशनवर खाली उचरण्याचीही गरज नाही. तुम्ही ट्रेनमध्ये बसून जेवण ऑर्डर करू शकता आणि खाऊ शकता.
कसा करावा वापर ?
– यासाठी सर्वप्रथम +91-9881193322 हा नंबर फोनमध्ये सेव्ह करा.
– WhatsApp वर Railofy चॅट उघडा.
– यानंतर 10 अंकी पीएनआर नंबर टाका आणि व्हॉट्सॲपवरील चॅटबॉटवर मेसेज पाठवा.
– यानंतर, येथे तुम्हाला रेल्वे चॅटबॉट Railofy वर ट्रेनचे लाइव्ह अपडेट्स मिळतील.