प्रत्येक वेळी छातीत दुखणे हे गॅसमुळेच होतं असं नाही, या कारणांमुळे दुखत असले तर तुमच्या हृदयाकडे लक्ष द्या….

श्वास लागणे आणि चालताना खूप थकवा येणे हे देखील हृदयाच्या समस्यांचे लक्षण असू शकते. या प्रकरणात, त्वरित तज्ञाचा सल्ला घ्या.

प्रत्येक वेळी छातीत दुखणे हे गॅसमुळेच होतं असं नाही, या कारणांमुळे दुखत असले तर तुमच्या हृदयाकडे लक्ष द्या....
तुमच्या घरात हृदयाशी संबंधित आजारांचा कौटुंबिक इतिहास असल्यास, वेळोवेळी ECG, Echo सारख्या मूलभूत चाचण्या करा.
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 4:10 PM

मुंबईः आजच्या काळात उच्च रक्तदाब (High blood pressure), मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा यासारख्या समस्या असणे म्हणजे आजच्या काळातील एक सामान्य गोष्ट झाली आहे. आपल्या आरोग्याबाबत निर्माण झालेल्या समस्या या आपली चुकीची जीवनशैली (Bad Lifestyale) आणि चुकीच्या आहारामुळे होतात. या चुकीच्या शैलीमुळेच हृदयविकाराचा धोका (Heart disease) वाढवतो आहे. या समस्या निर्माण झाल्या तरी अनेकदा ही लोकं अशा समस्या जाणून घेतल्यानंतरही आपली जीवनशैली कधीच बदलत नाहीत. त्यामुळेच आजकालच्या युवा वर्गातील अनेक तरुणांना हृदयविकाराचा झटका येतो.

या प्रकारच्या समस्या तुम्हालाही जाणवत असल्यास वेळीच सावध व्हा, आणि आपली जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न करा. जीवनशैलीत बदल करत नसाल तर या अडचणी तुम्हाला घातकही ठरू शकतात. यासाठीच आम्ही तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमच्यासाठी उपयुक्त आहेत.

छातीत दुखणे म्हणजे धोकाही असू शकतो

जर एकाद्याल छातीत दुखत असेल तर ते गॅसमुळेच दुखते असं काही जण समजतात. मात्र हे खूप धोकादायक आहे. हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक वेळी छातीत दुखते याचा अर्थ असा नसतो की ते दुखणे ह गॅसमुळेच दुखते. कधी कधी हृदयाच्या धमन्यांमध्ये जर अडथळे निर्माण झाले तर ती ही गॅसमुळे नसून ती हृदयातील समस्येमुळे झालेले असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही छातीत दुखण्याकडे गॅसचे दुखणे म्हणून दुर्लक्ष केले तर परिस्थिती तुमच्यासाठी घातक ठरू शकते.

विशेषदतज्ज्ञाचा सल्ला घ्या

त्यामुळे छातीत दुखत असेल तर आपण एखाद्या विशेषदतज्ज्ञाचा सल्ला घ्या. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नसल्यास, तुमच्या फॅमिली डॉक्टरांचाही सल्ला घ्या. पण छातीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करु नका.

दुखण्यातील फरक समजून घ्या

गॅसमुळे होणारा त्रास हा अनेकदा जेवणानंतर लगेच किंवा बराच वेळ रिकाम्या पोटी असाल तर होतो. यामध्ये, छातीच्या मध्यभागी किंवा छातीच्या वरच्या भागात वेदना किंवा जळजळ होते. त्याच वेळी, छातीच्या डाव्या बाजूला हृदयाजवळ वेदना होते. ही वेदना डाव्या खांद्यावर आणि डाव्या हाताच्या बाजूलाही जाते. अशा परिस्थितीत रुग्णाला काही वेळा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि घाम येणे सुरू होते. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हृदयदुखीचा धोका वाढतो कारण…

– उच्च रक्तदाब

– मधुमेह

– लठ्ठपणा

– चुकीचा आहार

– दारूचे जास्त सेवन

काय करायचं

-किमान तासभर नियमित व्यायामाची सवय लावून घ्या.

-वयाच्या 30 व्या वर्षांनंतर वेळोवेळी आरोग्य तपासणी करा.

-जास्त स्निग्ध पदार्थ आणि बाहेरील अन्न टाळा.

-मीठाचे सेवन मर्यादित करा.

-दारू आणि सिगारेट यांसारख्या कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांपासून दूर राहा.

-जर बीपी किंवा मधुमेहासाठी औषधे चालू असतील तर ती नियमितपणे घ्या.

-श्वास लागणे आणि चालताना खूप थकवा येणे हे देखील हृदयाच्या समस्यांचे लक्षण असू शकते. या प्रकरणात, त्वरित तज्ञाचा सल्ला घ्या.

-तुमच्या घरात हृदयाशी संबंधित आजारांचा कौटुंबिक इतिहास असल्यास, वेळोवेळी ECG, Echo सारख्या मूलभूत चाचण्या करा.

-चक्कर येणे, मूर्च्छा येणे ही देखील हृदयाच्या समस्यांशी संबंधित लक्षणे आहेत. अशी कोणतेही लक्षण दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

-कोणत्याही गंभीर आजारातून बरे झाल्यानंतर पाठपुरावा करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून तोच आजार पुन्हा होण्याचा धोका नाही किंवा त्याच्या जागी दुसरा कोणताही आजार होणार नाही.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.