महाराष्ट्र गारठला, पुढचे 2 ते 3 दिवस काळजी घ्या, काय Updates?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात वायव्य आणि मध्य भारतातील किमान तापमानात आणखी दोन ते चार अंश सेल्सियनचे घट होण्याची शक्यता आहे.
मुंबईः नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यात थंडीची (Cold Wave) लाट सुरु झाली आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी सुरु आहे. तर दिल्ली उत्तर प्रदेशातही (North India) प्रचंड गारठा वाढला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे.
मुंबईसह पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, लातूर, पभणी, नागपूर, जळगाव या शहरांमधील तापमानात कमालीची घसरण झाली आहे. मुंबई तर सोमवारी 15.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. राज्य भरातील अनेक शहरांमध्ये तापमानात 11 ते 12 अंशांनी घट झाली आहे.
Mumbai today morning, 2/01/2023
Min Temp CLB 18.8 °C SCZ 15.8 °C
-IMD MUMBAI
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 2, 2023
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात वायव्य आणि मध्य भारतातील किमान तापमानात आणखी दोन ते चार अंश सेल्सियनचे घट होण्याची शक्यता आहे.
ही गारठ्याची लाट येत्या मंगळवारपर्यंत राहिल. राजस्थानच्या उत्तर भागात या काळात थंडीची लाट कायम असल्याचे त्याचे परिणाम महाराष्ट्रातही दिसून येणार आहेत.
२०२३,नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा ????⛈☁?? Aurangabad 10.4 Pune 12.5 Nanded 16.4 Satara 14.9 Jalgaon 11 Klp 18.7 Sangli 17.3 Malegaon 17 Parbhani 16.5 Nashik 10 MWR 13.9 Harnai 19.7 Baramati 13.8 Dahanu 17.3 Slp 17.6 Udgir 16.5 Rtn 20 Matheran 15.2 Thane 22 Osbad 16 pic.twitter.com/tUE8mQ9gaS
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 1, 2023
लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनी या काळात थंडीपासून बचाव करण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.