Hair Care Tips : ओले केस विंचरल्याने तुटतात का ? कशी घ्यावी ओल्या केसांची काळजी, जाणून घ्या
केस ओले असताना अधिक नाजूक आणि पातळ होतात. अशा वेळी ते कंगव्याने विंचरल्यानंतर केस तुटण्याची शक्यता असते.
नवी दिल्ली : आजही अनेकांना केस विंचरण्याची योग्य पद्धत माहित नसते आणि परिणामी केस जास्त (hair care) गळायला लागतात. आजही काही स्त्रिया घाईघाईने ओले केस कंगव्याने (wet hair) विंचरतात. पण केस ओले असताना कंगव्याने विंचरले तर केसगळती वाढते. केस ओले असताना अधिक नाजूक आणि पातळ होतात आणि त्यामुळे जोरदार ब्रश केल्यावर केस तुटण्याची शक्यता असते. ओले असताना आणि सीरम लावल्यानंतर केस हलक्या हाताने विंचरावेत.
केस ओले असताना विंचरल्याने केस गळतात का ?
चांगले शोषले जाण्यासाठी केस अर्ध कोरडे असताना हेअर सीरम वापरण्याची शिफारस केली जाते. व्हिटॅमिनची कमतरता, हार्मोनल इम्बॅलेन्स यांसारख्या अनेक मार्गांनी केस गळू शकतात. त्यामुळे ओले केस विंचरणे हेच केसगळतीचे एकमेव कारण असू शकत नाही. कधीकधी खूप गरम किंवा घाणेरड्या पाण्याने केस धुतल्याने देखील केस गळतात. केस गळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी केसांच्या वाढीच्या चक्राचा भाग म्हणून होते. एका व्यक्तीचे दररोज सुमारे 50-100 केस गळतात. त्यामुळे केसांवर जास्त ताण देऊ नये. पण जर तुमचे केस जास्त गळत असतील तर ते तणाव, पौष्टिक कमतरता, हार्मोनल असंतुलन किंवा काही वैद्यकीय परिस्थितींमुळे असू शकते.
जाणून घ्या केस विंचरण्याची योग्य पद्धत
केस तुटू नयेत म्हणून ते ओले असताना काळजीपूर्वक हाताळावेत. नेहमी आपले गुंतलेले केस हलक्या हाताने सोडवावेत. अथवा रुंद दातांचा कंगवा वापरावा. केस ओढणे टाळावे आणि ओल्या केसांवर हेअर डिटेंगिंग स्प्रे किंवा सीरमशिवाय हीट स्टाइलिंग टूल्स वापरू नयेत त्याने नुकसान होऊ शकते.