या पाच कारणाने होतो बद्धकोष्ठतेचा त्रास, या उपायांनी होईल पोट साफ
चुकीचा आहार, ताण-तणाव, आरामदायी जीवनशैली यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतो. त्यापासून सुटका होण्यासाठी या घरगुती उपायांनी आराम मिळेल.
मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : आपल्या रहाणीमान आणि बदललेली जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठता आणि पोट जड होण्यासारखे आजार होत आहेत. आपल्या शरीरात योग्य प्रमाणात पाण्याचे प्रमाण जात नसल्याने देखील शौचाला कडक होत असते. बद्धकोष्ठतेसाठी अनेक घटक जबाबदार असून घरगुती उपायांमुळे या त्रासापासून सुटका होऊ शकते. आपण पोटाचे विकार सुरु झाले की लागलीच औषधे घ्यायला सुरुवात करतो. परंतू आपल्याकडे घरात असलेल्या औषधांमुळे या त्रासापासून आराम मिळू शकतो. बद्धकोष्ठतेची लक्षणे काय आणि त्यावर उपाय काय पाहूयात. .
बद्धकोष्ठतेची लक्षणे आणि कारणे –
पोटात दुखणे किंवा मुरडा येणे
पोट फुगणे किंवा सुजल्यासारखे वाटणे
अस्वस्थ किंवा मळमळणे
शौचाला त्रास होणे
कडक शौचास होणे
कारणे –
पाणी कमी प्रमाणात पिणे
आपले रुटीन बदलणे
जास्त दूध पिणे
आहारात फायबरचा अभाव
पेन किलरचा जास्त वापर
बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय –
1 ) भिजलेले तुळशीचे बी
सब्जा किंवा तुलशीचे बीज खाल्ल्याने तुरंत बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. 1 ते 2 मोठे चमचे तुळशीचे बी रात्रभर पाण्यात भिजवित ठेवावे. सकाळपर्यंत हे बी फुगतात.त्यानंतर त्याचे रुपांतर जेल सारखे होते. तुळशी बियांचे हे पाणी प्यायल्याने आराम मिळत आहे.
2 ) इसबगोल दूध किंवा पाण्याबरोबर घेणे
– इसबगोलला दूध किंवा पाण्याबरोबर प्यायल्याने आपल्याला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल. एक ग्लास गरम दूधात किंवा पाण्यात एक मोठा चमचा इसबगोल टाकून प्यायल्याने शौचास साफ होईल.
3 ) दूधासोबत अंजीर
सुकलेल्या अंजीरात फायबर भरपूर असतात. त्यामुळे शौचाला साफ होते. दोन अंजीर रात्रभर दूधात भिजवून ठेवावे. सकाळी उपाशी पोटी ते खावे
4 ) त्रिफळा आणि देशी तूप
त्रिफळा चूर्ण बद्धकोष्ठतेत परीणाम कारक ठरते. ते रेचक म्हणून काम करते. तसेच पोटाचील मैला बाहेर पडण्यात मदत करते. एक वाटीत एक चमचा त्रिफळा चूर्ण आणि एक चमचा तूप घालून नीट मिक्स करावे. झोपण्यापूर्वी गरम पाण्यासोबत घ्यावे. ( हे उपाय सामान्य माहितीवर आधारीत आहेत. योग्य उपचारासाठी किंवा अतिरिक्त माहीतीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )