Constipation : बद्धकोष्ठतेमुळे वैतागलात का ? ‘हे’ 5 पदार्थ आवर्जून खा..
दह्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेमध्ये आराम मिळतो. यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यासाठी रोज दह्याचे सेवन करावे.
नवी दिल्ली : खराब जीवनशैली, जंक फूडचे (junk food) अतिसेवन, धूम्रपान, चहा-कॉफीचे अतिसेवन, कमी पाणी पिणे, व्यायाम बिलकूल न करणे, रात्री उशीरा जेवणे अशा सवयींमुळे आजकाल अनेक लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बद्धकोष्ठता (constipation) म्हणजे पोट साफ न होणे व मलत्याग करताना त्रास होणे. या स्थितीत, मलत्याग करताना अतिशय त्रास होतो. यासोबतच डोकेदुखी, पोटात गॅस (gases in stomach) होणे आणि भूक न लागणे अशा समस्याही उद्भवतात. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी आहारात काही बदल करावेत, जास्तीत जास्त पाणी प्यावे तसेच फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे, यामुळे अन्नाचे पचन होण्यास अडथळा निर्माण होत नाही. काही हेल्दी पदार्थांचे नियमितपणे सेवन केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.
जर तुम्हीही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल आणि त्यापासून सुटका मिळवण्याची इच्छा असेल तर दररोज या 5 गोष्टींचे सेवन करावे. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया..
अंजीर खावेत
जर तुम्हीसुद्धा बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल आणि त्यापासून सुटका हवी असेल तर अंजीराचे सेवन अवश्य करावे. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळते. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी फायबर युक्त अन्न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यासाठी रोज सकाळी भिजवलेले अंजीर नीट चावून खावेत.
दह्याचे करा सेवन
आपल्यापैकी बऱ्याच जणांना दही खायला आवडते. या दुग्धजन्य पदार्थाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येतही आराम मिळतो. दह्यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यासाठी दररोज दह्याचे सेवन करावे.
ज्येष्ठमध ठरतो गुणकारी
मुलेठी अर्थात ज्येष्ठमधाला आयुर्वेदात औषधाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्याच्या सेवनाने देखील बद्धकोष्ठता दूर होते. यासाठी एक ग्लास कोमट दुधात एक चमचा ज्येष्ठमधाची पावडर नीट मिसळावी व त्याचे सेवन करावे. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास खूप फायदा होतो.
तुपामुळे मिळतो खूप फायदा
तूप हे आपल्या त्वचेसाठी तसेच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, हे तर सर्वांनाच माहीत आहे. त्याच्या सेवनाने त्वचाही चमकदार होते. तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या दूर करायची असेल तर तुपाचे सेवन करणेही खूप लाभदायक ठरते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात एक चमचा तूप मिसळून प्या. हा उपाय केल्याने देखील बद्धकोष्ठता लवकर दूर होते.
आलूबुखारा खावे
जर तुम्ही पोटाच्या विकारांनी त्रस्त असाल आणि त्यापासून सुटका हवी असेल तर तुम्ही आलूबुखारा खाऊ शकता. त्यात फायबरसह अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर आहे. यासाठी रोज सकाळी त्यांचे सेवन करावेत.
तसेच रोज सकाळी उठल्यावर अंशपोटी भिजवलेल्या मनुका चावून खाल्यानेही बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)