दुधासह हे पदार्थ कधीच खाऊ नका, नाहीतर…
दूध हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. त्यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्ससारखी पोषक तत्वं असतात. नियमितपणे दूध प्यायल्यास आरोग्याच्या अनेक गंभीर आजारांपासून रक्षण होते. पण काही पदार्थांचे दुधासह सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
नवी दिल्ली | 14 ऑगस्ट 2023 : शरीर हेल्दी ठेवण्यासाठी आपण रोजच्या आहारात पोषक तत्वांनी युक्त असलेल्या अनेक पदार्थांचा समावेश करतो. दूध हे (milk) देखील हेल्दी डाएटचाच भाग असते. त्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ए, बी-6, डी, के, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, आयोडीन असे अनेक घटन असतात, जे शरीर स्वस्थ राखण्यास मदत करतात. पण बऱ्याच वेळेसे आपण खाण्यापिण्याशी संबंधित काही अशा चुका (food mistakes) करतो, ज्यामुळे आपल्याला आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
आयुर्वेदानुसार, दूध प्यायल्यानंतर काही पदार्थांचे सेवन करणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. दुधासह कोणते पदार्थ खाणे टाळावे, ते जाणून घेऊया.
दूध-दही
आयुर्वेदानुसार दूध आणि दही एकत्र कधीच सेवन करू नये. दुधासोबत दही खाणे किंवा दूध प्यायल्यानंतर दही खाणे, हे दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक आहेत. यामुळे पोटाशी संबंधित समस्या देखील निर्माण होऊ शकतात किंवा पोटही खराब होऊ शकते.
फळं आणि दूध
दूध आणि आंबट फळेही एकत्र खाऊ नयेत. लिंबूवर्गीय फळे आणि दुधाचे एकत्र सेवन केल्यास उलट्या किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला दूध प्यायचेच असेल तर फळे खाल्ल्यानंतर साधारण 2 तासांनी ते प्यावे.
दूध आणि गूळ
बऱ्याचदा लोकं दुधात साखरेऐवजी गूळ घालतात. हा एक हेल्दी ऑप्शन आहे पण आयुर्वेदानुसार दुधासह गुळाचे सेवन करणे हे पोटासाठी नुकसानकारक ठरू शकते. यामुळे पोट खराब होण्याची शक्यता उद्भवते.
मासे खाल्ल्यावर दूधाचे सेवन
मासे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात, परंतु दूध आणि मासे एकत्र कधीही सेवन करू नये. यामुळे तुम्हाला फूड पॉझनिगं, पोटदुखी इत्यादी पचनाच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो. याशिवाय त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात. याशिवाय नारळ आणि दूध यांचे एकत्र सेवन करणे देखील आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)