covid-19 new symptoms: भारतातही वाढतोय नवा व्हेरिएंट ! ही लक्षणे दिसताच व्हा सावध

चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढला असून भारतासह जगातील सर्व देश हाय अलर्टवर आहेत. वेळेनुसार या व्हायरसचा नवा व्हेरिएंट समोर येत असून त्याची लक्षणेही बदलत आहेत.

covid-19 new symptoms: भारतातही वाढतोय नवा व्हेरिएंट ! ही लक्षणे दिसताच व्हा सावध
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 23, 2022 | 3:31 PM

नवी दिल्ली – चीनमध्ये कोरोनाने (corona) पुन्हा हाहाकार माजवला असून तेथे हजारो लोक रुग्णालयात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतासह जगातील सर्व देशहाय अलर्टवर असून भारतात सर्व राज्यांना अलर्ट रहायची सूचना केंद्र सरकारने दिली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयानेही तातडीची बैठक बोलावून काही नवे नियम (new guidelines) जारी केले आहेत. चीनमध्ये कोविडची प्रकरणे वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या ओमिक्रॉनचा बीएफ.7 (BF.7 variant of Omicron) हा नवा व्हेरिएंट समोर आला आहे.

कोरोना व्हायरल सतत म्यूटेट (उत्परिवर्तन) होत असून त्यामुळे त्याच्या लक्षणातही बदल होत आहे. अशी अनेक प्रकरणेही समोर आली आहेत ज्यात लसीकरण झालेले लोक देखील कोविड पॉझिटिव्ह होत आहेत. खरंतर काही लक्षणे अशी आहेत ज्यांच्याकडे आपण सामान्य लक्षणे समजून दुर्लक्ष करतो, मात्र ते कोरोनाचेही लक्षण असू शकते.

ही लक्षणे कोणती ते जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

– गळ्यात खवखव होणे – शिंका येणे – सर्दीमुळे वाहते नाक – सर्दीमुळे नाक बंद होणे – कफ नसलेला (कोरडा) खोकला – डोकेदुखी – कफयुक्त खोकला – बोलण्यास त्रास होणे – स्नायूंमध्ये वेदना होणे – वास / गंध न येणे – जास्त ताप येणे – थंडी वाजून, हुडहुडी भरून ताप येणे – सतत खोकला येणे – थकवा वाटणे – भूक कमी लागणे

यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवावे व गरज पडल्यास चाचणी करून घ्यावी.

खूप सामान्य लक्षणे

एका अभ्यासानुसार, गंध अथवा वास न येणे तसेच धाप लागणे ही कोविड-19 च्या BF-7 व्हेरिएंटची सामान्य लक्षणे आहेत. कोरोनाच्या इतर प्रकारांमध्येही हे सर्वात सामान्य लक्षण होते.

लक्षणे दिसल्यास काय करावे ?

नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, बऱ्याच लोकांना संसर्ग झाल्यावर पाच दिवसांनीही इतरांना संसर्ग होत नाही तर काही लोक असे असतात जे संसर्ग झाल्यानंतर 10 दिवसांपर्यंत संसर्ग (इतरांमध्ये) पसरवू शकतात. त्यामुळे ज्यांना या आजाराशी संबंधित कोणतीही लक्षणे दिसतील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांनी पाच दिवस इतर लोकांच्या संपर्कात येणे टाळावे आणि किमान 10 दिवस वृद्ध-मुले किंवा आजारी व्यक्तींना भेटणे टाळावे. तसेच वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे भारताला घाबरण्याची गरज नाही. पण भारतीयांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले असून त्यामध्ये वृद्ध व्यक्ती, तरुण आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.