मुंबईत 15 जुलैपासून पाचव्या सेरो सर्व्हेक्षणास सुरुवात; सर्व वयोगटांच्या अँटीबॉडीज तपासणार!

मुंबईत येत्या 15 जुलैपासून पाचवे सेरो सर्व्हेक्षण सुरू होणार आहे. त्यांतर्गत सर्व वयोगटातील नागरिकांच्या अँटिबॉडीज तपासल्या जाणार आहेत. (sero survey)

मुंबईत 15 जुलैपासून पाचव्या सेरो सर्व्हेक्षणास सुरुवात; सर्व वयोगटांच्या अँटीबॉडीज तपासणार!
sero-survey
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 6:48 PM

मुंबई: मुंबईत येत्या 15 जुलैपासून पाचवे सेरो सर्व्हेक्षण सुरू होणार आहे. त्यांतर्गत सर्व वयोगटातील नागरिकांच्या अँटिबॉडीज तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे कोरोना विरोधात मुंबईकरांमध्ये निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीचा अंदाज येणार आहे. (Covid-19: BMC will starts fifth phase of sero-survey in Mumbai from 15th july)

पहिल्या टप्प्यात मुंबई महापालिका आणि काही संस्थांनी सेरो सर्वेक्षण केले होते. त्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये झोपडपट्टीत 57 टक्के व बिगर झोपडपट्टी भागात 16 टक्के अँटीबॉडीजचे प्रमाण आढळून आले होते. सर्व्हेच्या दुसऱ्या टप्प्यात तीन वॉर्डांमध्ये सर्वेक्षणात 5,840 जणांची तपासणी करण्यात आली होती. झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 45 टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 18 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत.

50 टक्क्यांहून जास्त मुलांमध्ये अँटीबॉडीज

तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात 10 हजार 197 नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते. यामध्ये 36.30 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडिज आढळल्या होत्या. सेरो सर्वेक्षणाच्या चौथ्या टप्प्यात 1 एप्रिल ते 15 जून 2021 या कालावधीत सर्व वॉर्डांमध्ये मुलांमध्ये सेरो सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात 50 टक्क्यांहून जास्त मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या होत्या. त्यामुळे पाचव्या टप्प्यात सर्व वयोगटांमध्ये किती टक्के अँटिबॉडीज आढळून येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

त्यांची ब्लड टेस्ट होणार

दरम्यान, मुंबईत बनावट लसीप्रकरणी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बनावट लस प्रकरणात ज्यांनी ज्यांनी लस घेतली होती, त्यांच्या रक्ताची चाचणी करण्यात येणार आहे. या लसीव्यतिरिक्त नागरिकांना नक्की कोणतं केमिकल देण्यात आलं यासाठी ही तपासणी होणार आहे. काहीजणांच्या रक्ताचे नमूनेही घेण्यात आले आहेत. 2600 लोकांना ही बनावट लस देण्यात आली होती. यातील बऱ्याच जणांना थकवा जाणवत असल्याच्या अद्याप तक्रारी येत आहेत. पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या नेतृत्वात या सगळ्या प्रकरणाची एका विशेष पथकामार्फत चौकशी सुरू आहे. काल पोलिसांनी शिवम हॉस्पिटलमध्ये छापा टाकून या बनावट लसीच्या काही रिकाम्या व्हाईल्स जप्त केल्या असून त्या फॉरेन्सिकला पाठवण्यात आल्या आहेत.

देशात सध्या 5 लाख सक्रिय रुग्ण

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 4 लाख 11 हजार 634 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 94 लाख 88 हजार 918 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 99 हजार 459 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 5 लाख 23 हजार 257 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 33 कोटी 57 लाख 16 हजार 19 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Covid-19: BMC will starts fifth phase of sero-survey in Mumbai from 15th july)

संबंधित बातम्या:

Aditya Thackeray LIVE | कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही : आदित्य ठाकरे

कोरोना लसीचा पुरवठा नाही, पुणे शहरात महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रं बंद

 लसीकरण पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये उघडणे शक्य नाही : उदय सामंत

(Covid-19: BMC will starts fifth phase of sero-survey in Mumbai from 15th july)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.