राजधानी दिल्लीतही वाढतोय कोरोना, दोन जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट 13 टक्क्यांवर, हॉस्पिटलायझेशमध्येही झाली वाढ

Corona cases In Delhi : देशाची राजधानी दिल्ली येथे कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 500 च्या पुढे गेली आहे. दोन जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 13 टक्क्यांहून अधिक आहे.

राजधानी दिल्लीतही वाढतोय कोरोना, दोन जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट 13 टक्क्यांवर, हॉस्पिटलायझेशमध्येही झाली वाढ
Image Credit source: File Photo
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 3:55 PM

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून राजधानी दिल्लीतही कोरोनाचे (corona cases in Delhi) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 500 च्या पुढे गेली आहे. राजधानीत सकारात्मकता दर अर्थात पॉझिटिव्हिटी रेट (positivity rate) झपाट्याने वाढत आहे. दोन जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण 13 टक्क्यांच्या पुढे गेले आहे. दिल्लीच्या पूर्व जिल्ह्यात 13.1 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि दक्षिण दिल्लीत 13.8 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. म्हणजेच या दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येक 100 चाचण्यांमागे कोविडचे 14 रुग्ण (covid patients) आढळून येत आहेत. गेल्या एका आठवड्यापासून कोविडचा आलेख सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.

दिल्लीच्या आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना रूग्णांच्या चाचण्या वाढवण्याचे आणि जीनोम सीक्वेंन्सिंग वाढवण्याचे आदेश दिले आहेत. डॉक्टरांनीही लोकांना कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविडची प्रकरणे सातत्याने वाढत असून अशा परिस्थितीत लोकांनी सावध राहण्याची गरज आहे, असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. कोरोनाला हलक्यात घेऊ नये. वृद्ध व्यक्ती किंवा जुनाट आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना संसर्ग झाल्यास त्यांना धोका असू शकतो, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

हॉस्पिटलायझेशन मध्येही होत आहे वाढ

हे सुद्धा वाचा

दिल्लीतील लोकनायक रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, गेल्या तीन महिन्यांत एकही कोविड रुग्ण रुग्णालयात दाखल झाला नव्हता, परंतु आता गेल्या काही दिवसांपासून रुग्ण दाखल होत आहेत. सध्या रुग्णालयात दोन कोरोना रुग्ण दाखल आहेत. रूग्णालयात येणार्‍या बहुतेक रूग्णांमध्ये केवळ सौम्य लक्षणे आहेत. लोकं खोकला, सर्दी आणि सौम्य ताप आल्याची तक्रार करत आहेत. तर काही रुग्णांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी कोविड वॉर्ड तयार आहेत. रुग्णांची संख्या वाढल्यास आणखी खाटांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

ओमिक्रॉन XBB.1.16 व्हेरिअंटच्या केसेसही वाढल्या

तज्ञांचे म्हणणे आहे की कोविडच्या XBB.1.16 प्रकारामुळे अनेक राज्यांमध्ये प्रकरणे वाढत आहेत. हा प्रकार वेगाने पसरत आहे आणि लोकांना संक्रमित करत आहे. याशिवाय हवामानात होणारा बदल आणि लोकांचे दुर्लक्ष हेही विषाणू वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. सध्या तरी लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. तज्ञांनी लोकांना मास्क घालण्याचा आणि गर्दीत न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायजर वापरणे, अशी काळजीही नीट घ्यावी असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.