कोरोना प्रतिबंधक लसींचा हार्ट अटॅकशी काही संबंध आहे का ? संशोधकांनी काय म्हटलं ?

या संशोधनाच्या टीमने ऑगस्ट 2021 आणि ऑगस्ट 2022 दरम्यान जीबी पंत रुग्णालयात दाखल 1,578 हृदयविकाराने ग्रस्त रुग्णांचा अभ्यास केला.

कोरोना प्रतिबंधक लसींचा हार्ट अटॅकशी काही संबंध आहे का ? संशोधकांनी काय म्हटलं ?
heart attack Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 10:29 PM

नवी दिल्ली | 4 सप्टेंबर 2023 : कोरानाच्या साथीनंतर अचानक तरुणांचे हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे या प्रकारामागे कोविड-19 काळात झालेले लसीकरणाला जबाबदार धरले जात होते. परंतू राजधानी दिल्ली येथील जीबी पंत रुग्णालयात कोरोनाकाळानंतर अचानक हृदय विकाराने झालेल्या तरुणाच्या मृत्यूंचा अभ्यास केला जात होता. परंतू कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन लसींमुळे हे हृदयविकाराचे मृत्यू झाले आहेत का ? काय संशोधनातून उघड झाले पाहूया…

गोविंद वल्लभपंत इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडीकल एज्युकेशन एण्ड रिसर्च या रुग्णालयाच्या कार्डीओलॉजी विभागाचे डॉ. मोहित डी. गुप्ता यांनी याबाबत महत्वाची माहीती दिली आहे. डॉ. गुप्ता यांचा अभ्यास पीएलओएस वन जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात म्हटले आहे की कोविड-19 लसींच्या मायोकोर्डीया इन्फेक्शन ( एएमआय ) नंतर 30 दिवस आणि सहा महिन्यात मृत्यूदर कमी असल्याचे आढळले. हे संशोधन एएमआय रुग्णांच्या मोठ्या संख्येवर झालेले पहिलेच अशा प्रकारचे संशोधन आहे. ज्यात स्पष्ट झाले की कोविड – 19 व्हॅक्सीन केवळ सुरक्षितच नाही तर अल्पावधित मृत्यूदर रोखण्यासाठी सुरक्षित आहे.

असे झाले संशोधन

या संशोधनाच्या टीमने ऑगस्ट 2021 आणि ऑगस्ट 2022 दरम्यान जीबी पंत रुग्णालयात दाखल 1,578 हृदयविकाराने ग्रस्त रुग्णांचा अभ्यास केला. एकूण रुग्णांपैकी 69 जणांनी लसी घेतल्या होत्या. तर 31 टक्के रुग्णांनी कोविडची लस घेतली नव्हती. लसी घेतलेल्यांपैकी 96 रुग्णांनी दोन्ही लसी घेतलेल्या होत्या. तर 4 टक्के लोकांनी एकच लस घेतली होती. त्यातील 92.3 टक्के जणांनी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशील्ड लस घेतली होती. तर 7.7 टक्के रुग्णांनी हैदराबादच्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस घेतली होती.

इतरही कारणे मृत्यूस जबाबदार

या संशोधनात लसीकरणाचा हार्ट अटॅकशी काहीही संबंध असल्याचे स्पष्ट झाले नाही. केवळ दोन टक्के हार्ट अटॅक लसी घेतल्यानंतर पहिल्या 30 दिवसात आले होते. तर बहुतांशी हार्ट अटॅक लसी घेतल्यानंतर 90-270 दिवसात आले. हार्ट अटॅक आलेल्या 1,578 रुग्णांपैकी 13 टक्के रुग्णांचा सरासरी 30 दिवसात मृत्यू झाला. त्यापैकी 58 टक्के लसी घेतलेले होते. तर 42 टक्के लस न घेतलेले होते. या रुग्णांना आधीच असलेल्या आजारांचा विचार करता लसी घेतलेल्याचा 30 दिवसात मृत्यूची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होती. वाढते वय, मधुमेह आणि धूम्रपान यांचा 30 दिवसांतील मृत्यूशी जास्त संबंध आढळला आहे.

आयसीएमआरचेही संशोधन सुरु 

30  दिवस ते सहा महिन्यात 75 रुग्णांचा मृत्यू झाला, त्यातील 43.7 टक्के रुग्णांचे लसीकरण झाले होते. परंतू इतर आजारांचा विचार करता लसीकरणाने झालेल्या मृत्यूदराची शक्यता फार कमी आढळली. आता आयसीएमआर देखील कोविड-19 साथीनंतर तरुणांच्या हृदय विकाराने अचानक झालेल्या मृत्यूंचा स्वतंत्रपणे अभ्यास करीत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.