बुद्धिमान लोकांमध्ये असतात या सवयी, तुम्ही या लिस्टमध्ये आहात की नाही ?
साधारणत: आपण ज्या लोकांना इंटेलिजंट किंवा बुद्धिमान मानतो, त्यांना काही अशा सवयी असतात, ज्या सामान्य लोकांच्या तुलनेत वेगळ्या असतात. त्या कोणत्या हे जाणून घेऊया.
नवी दिल्ली : आपण हुशार, बुद्धिमान असावं, प्रत्येक क्षेत्रातलं चांगलं ज्ञान (knowledge)आपल्याला मिळावं अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. हुशार होण्यासाठी, आपण ब्रेन गेम्स (brain games) खेळतो, अनेक कार्यशाळेत सहभाग घेतो आणि सामाजिक उपक्रम आणि ज्ञान वाढवणारी पुस्तके देखील वाचतो. तरीही काही गोष्टी अशा असतात, ज्यामुळे बुद्धिमान, हुशार लोक (intelligent people) सामान्य लोकांपेक्षा वेगळे असतात. खरंतर त्यांच्या काही सवयी असतात, ज्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व वेगळे बनते आणि गर्दीतही ते ( बुद्धिमान लोक) ओळखले जातात. ते सामान्यांपेक्षा कसे वेगळे बनतात, त्यांच्या कोणत्या सवयी इतरांपेक्षा वेगळ्या असतात, हे जाणून घेऊया.
बुद्धिमान लोकांमध्ये असतात या 5 खास सवयी
शिकण्याची असते उत्सुकता
बुद्धिमान लोकांना त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाबद्दल बढाई मारणे आवडत नाही, उलट त्यांचे संपूर्ण लक्ष त्यांचे ज्ञान आणि माहिती वाढवण्यावर असते. असे लोक स्वतःला कमी ज्ञानी असल्याचे दाखवतात आणि नवनवीन गोष्टी शिकण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे त्यांना कोणाकडूनही ज्ञान घेणे आवडते, काही शिकायला ते नेहमीच उत्सुक असतात. इतरांकडून माहिती घेताना, ज्ञान मिळवताना त्यांना कमीपणा वाटत नाही.
गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे
एखाद्या विषयाची पूर्ण माहिती मिळेपर्यंत ते त्याबद्दल शोध घेत राहतात. त्यासाठी ते त्यांना शक्य असतील तेवढे सर्व प्रयत्न करतात आणि मुळापर्यंत पोहोचल्याशिवाय त्यांच्या मनाला शांती मिळत नाही. यासाठी ते सर्व प्रकारच्या माध्यमांचा सहज वापर करतात, पूर्ण प्रयत्न करतात. क्लू शोधून गोष्टींचा संबंध एकमेकांशी जोडायला त्यांना फार आवडतं.
विसंगतीचा त्रास होत नाही
जे लोक बुद्धिमान, हुशार असतात त्यांचा कोणत्याच गोष्टीत आग्रह नसतो. त्यांना कोणत्याही गोष्टीतील विसंगती किंवा मतभेदांचा त्रास होत नाही, ते खटकत नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या मनात दोन विसंगत गोष्टींचा विचार घेऊन ते सहज फिरू शकतात. ते मोकळ्या मनाचे म्हणजेच ओपन माईंडेड असतात. सर्व शक्यता तपासून पहायला, वेगळे विचार ॲक्सेप्ट करायला, तसेच वेगळ्या विचारसरणीच्य लोकांशी जुळवून घ्यायला, त्यांची स्तुती करायला अशा लोकांची हरकत नसते.
प्रश्न विचारणं आवडतं
बुद्धिमान लोकांना नवी माहिती मिळवायला, त्यासाठी विविधं लोकांना प्रश्न विचारायला आवडतात आणि ते कोणत्याही विषयावर सतत प्रश्न विचारू शकतात. त्यांना गोष्टी शिकण्याची आणि जाणून घेण्याची आतून ऊर्मी असते आणि प्रत्येक विषयाबाबत कुतूहल असते.
आपली चूक सहज मान्य करतात
हुशार, बुद्धिमान अशा लोकांकडून काही चूक झाली, तर ते आपल्या चुका सहज स्वीकारतात. त्यांना इतरांना दोष देणे आवडत नाही. एवढेच नाही तर असे लोक स्वतःला हुशार दाखवण्यासाठी इतरांसमोर वाईट गोष्टी करत नाहीत, किंवा वाईट बोलत नाहीत. अशा लोकांमध्ये नेतृत्वगुणही असतो, ते समोरच्याला योग्य दिशा दाखवून काम करून घेतात आणि त्या कामात स्वत:सुद्धा सहभागी होतात. नुसत्या सूचना देत बसत नाहीत.