1 Kg Kidney Stone: तब्बल एक किलोचा मुतखडा, भारतातली पहिली मोठी शस्त्रक्रिया! इंडिया बुक, आशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल

त्यांना अनेक महिन्यापासून मुतखड्याचा त्रास असल्याने अनेक ठिकाणी जाऊन ही त्यांचे निदान न झाल्याने शेतकऱ्यावर धुळ्यातील डॉ. आशिष पाटील यांनी तेजनक्ष हॉस्पिटल मध्ये 1 तासाच्या अथक परिश्रमातून शेतकऱ्याच्या कंबरेतून या मुतखड्याला बाहेर काढण्यात डॉ आशिष पाटील यांना यश आले आहे.

1 Kg Kidney Stone: तब्बल एक किलोचा मुतखडा, भारतातली पहिली मोठी शस्त्रक्रिया! इंडिया बुक, आशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल
Dr. Ashish Patil DhuleImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 5:10 PM

धुळे: धुळ्यातील नामांकित डॉ आशिष पाटील (Dr. Ashish Patil) यांनी शेतकऱ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली असून शेतकऱ्याच्या पोटातून तब्बल एक किलोचा मुतखडा (Kidney Stone) काढून शेतकऱ्याला जीवनदान दिले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल इंडिया बुक व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली असून त्याची नोंद केली आहे. भारतातील झालेले हे आतापर्यंतचं मुतखड्यावरील सर्वात मोठे शस्त्रक्रिया असल्याची माहिती डॉ. आशिष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. रमण चौरे वय 50, रा. नंदुरबार असे शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना अनेक महिन्यापासून मुतखड्याचा त्रास असल्याने अनेक ठिकाणी जाऊन ही त्यांचे निदान न झाल्याने शेतकऱ्यावर धुळ्यातील (Dhule) डॉ. आशिष पाटील यांनी तेजनक्ष हॉस्पिटल मध्ये 1 तासाच्या अथक परिश्रमातून शेतकऱ्याच्या कंबरेतून या मुतखड्याला बाहेर काढण्यात डॉ आशिष पाटील यांना यश आले आहे.

 20-25 मिनीट मुतखडा कंबरेतून काढायला गेले

इंडिया बुक व आशिया बुक ऑफमध्ये रेकॉर्ड नोंदवला गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले ” हा रेकॉर्ड मुतखड्याच्या पिशवीमधून खडा काढण्याचा झाला आहे. याअगोदरचा विश्वविक्रम 9 सेमीचा होता.” पुढे डॉक्टर म्हणाले ”आम्हाला 1 तास रुग्णाच्या मुतखड्यापर्यंत पोहोचायला गेले, त्यानंतर 20-25 मिनीट मुतखडा कंबरेतून काढायला गेले. कारण हा खडा एवढा मोठा होता की तो रुग्णाच्या कंबरेत अडकला होता. रुग्णाची परिस्थिती उत्तम आहे आणि लवकरच तो बरा होऊन घरी जाईल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर काय म्हणाले?

  • जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास जाणवू लागला तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • मुतखडा एवाढा मोठा होईपर्यंत वाट पाहू नका त्याने तुम्हाल इतर आजार होऊ शकतात.
  • तुम्ही मुतखड्याचा आजार जास्त काळ अंगावर काढला तर किडनी फेल होऊ शकते
  • कर्करोग होऊ शकतो
  • किडनीचे अन्य आजार होऊ शकतात

पाच पेटंट मिळविणारे डॉक्टर आशिष पाटील

पाटील यांना आतापर्यंत दोन गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड, दोन लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, दोन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यासह 21 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मूत्ररोग चिकित्सालयातील विविध संशोधकांचे पाच पेटंट मिळविणारे डॉक्टर आशिष पाटील भारतातील एकमेव डॉक्टर ठरले आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.