इतके तास झोपला तर डायबेटिज होऊ शकतो, या लोकांना सर्वाधिक धोका

या लेखात मधुमेह आणि अपुऱ्या झोपेतील संबंध स्पष्ट केले आहेत. सहा तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने मधुमेहाचा धोका किती वाढतो हे सांगितले आहे. ज्यांचं आधीपासून वजन अधिक आहे, कुटुंबात मधुमेहाचा इतिहास आहे किंवा जे नियमितपणे जेवत नाहीत त्यांना मधुमेहाचा जास्त धोका असतो. लेखात पुरेशी झोप कशी घ्यावी याबद्दलही मार्गदर्शन दिले आहे.

इतके तास झोपला तर डायबेटिज होऊ शकतो, या लोकांना सर्वाधिक धोका
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 3:06 PM

हल्लीच्या काळात कुणालाही डायबिटीज हा आजार होताना दिसत आहे. खासकरून शहरी लोकांमध्ये डायबिटीजचं प्रमाण अधिक आहे. त्यातही 30 वर्षापासूनच्या पुढच्या वयोगटातील लोकांना डायबिटीज वेगाने होताना दिसत आहे. खाण्यापिण्याच्या वेळा न पाळणं, लाइफस्टाईलची ऐशीतैशी, मानसिक तणाव आदी कारणामुळे डायबिटीज होत असतो. पण अपुऱ्या झोपेमुळेही डायबिटीज होतो हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्ही सहा तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर तुम्हाला डायबिटीज होण्याची शक्यता अनेकपटीने असते. त्यामुळे पुरेशी झोप घेण्यावर भर द्या.

शरीरात गरजेप्रमाणे इन्सुलिन तयार होत नाही. त्यामुळे शुगर लेव्हल वाढते. परिणामी डायबिटीज होतो. हा आजार जेनेटिक कारणानेही होतो. त्याला टाइप-1 डायबिटीज म्हटलं जातं. जेव्हा खाण्यापिण्याची पथ्य पाळली जात नाही, लाइफस्टाईल बिघडतं तेव्हा हा आजार होतो. त्याला टाइप 2 म्हटलं जातं. गेल्या काही वर्षात टाइप-2 च्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. झोपेचा खराब पॅटर्न हे त्याचं मुख्य कारण आहे. मेडिकल जर्नल द नेचरने एक रिसर्च प्रकाशित केला आहे. त्यात सहा तास झोप न घेतल्यास डायबिटीजचा धोका अनेकपटीने वाढू शकतो, असं म्हटलं आहे.

झोप आणि डायबिटीजचा काय संबंध?

जीटीबी हॉस्पिटल मेडिसिन विभागाचे डॉ. अजित कुमार यांनी यावर प्रकाश टाकला आहे. नीद आणि डायबिटीजचा अत्यंत निकटचा संबंध आहे. झोपेच्या बिघडलेल्या पॅटर्नमुळे डायबिटीज होतो. जेव्हा एखादी व्यक्ती पुरेशी झोप घेत नाही तेव्हा इन्सुलिन्स रसिस्टेन्स होतो. त्यामुळे ब्लड शुगरचं प्रमाण वाढतं. झोपेच्या अभावामुळे शरीरात कोर्टिसॉल हार्मोनची लेव्हल वाढते. या हॉर्मोनची लेव्हल वाढल्याने त्याचा थेट परिणाम ब्लड शुगरवर होतो. त्यामुळे ब्लड शुगर वााढतो. ही समस्या दीर्घकाळ राहते. त्यामुळे डायबिटीज होतो, असं अजित कुमार यांचं म्हणणं आहे.

या लोकांना अधिक धोका

ज्या कुटुंबातील कुणालाही यापूर्वी डायबिटीज असेल, ज्यांचं वजन वाढलं असेल आणि ज्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा नियमित नसतील अशा लोकांना डायबिटीजचा धोका सर्वाधिक असतो. स्थुलतेचा संबंधही डायबिटीजशी असतो. अनेकदा तर शरीराचं वाढलेलं फॅटही डायबिटीजला कारणीभूत ठरलं आहे. द लँसटच्या रिसर्चनुसार, वाढलेल्या बीएमआयमुळे डायबिटीज होण्याची शक्यता अधिक असते. ही शक्यता तीनपट असते. त्यामुळेच स्थुल असलेले लोक डायबिटीजचे शिकार झालेले पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे जे लोक दीर्घकाळापासून पुरेशी झोप घेत नाहीत, त्यांना डायबिटीजचा धोका अधिक असतो.

चांगली झोप कशी घ्यावी?

रात्री झोपण्याच्या दोन तास आधी जेवण करा

रात्री फोन किंवा लॅपटॉपवर राहू नका

रात्री चहा किंवा कॉफी पिऊ नका

झोपण्याची वेळ ठरवा

रोज किमान सात ते आठ तास झोप घ्या

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.