diabetes: मधुमेहींसाठी साखरेइतकेच घातक आहेत या गोष्टी, तुम्ही देखील खात असाल तर लगेच करा बंद
रक्तातील साखर वाढण्यासाठी फक्त साखरच कारणीभूत नसते, तर इतरही गोष्टी या साखरेइतकेच घातक असतात.
मुंबई, मधुमेह (diabetes) झाल्यानंतर डॉक्टर पहिला सल्ला देतात तो म्हणजे साखरेपासून (Sugar) दूर राहण्याचा. साधारणपणे लोकं मधुमेहासाठी साखर जबाबदार मानतात, मात्र काही पदार्थांचे सेवन हे साकरेइतकेच घातक आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढविण्यासाठी फक्त साखरच जबाबदार नसते. साखरेशिवाय इतरही गोष्टी अशा आहेत ज्या मधुमेहाच्या उंबरठ्यावर असलेल्यांना किंवा मधुमेहींना धोक्याच्या जवळ नेतात. जर तुम्ही मधुमेहाने ग्रस्त असाल तर तुम्हाला वेळीच या पदार्थाने सेवन थांबविणे गरजेचे आहे.
पॅकेज केलेले स्नॅक्स
पॅक केलेले स्नॅक्स रक्तातील साखरेचे (ग्लुकोज) प्रमाण वाढवण्यास जबाबदार असतात. चिप्स, वेफर्स, कुकीज यांसारख्या स्नॅक्समध्ये भरपूर मीठ तर असतेच पण ते मैद्यापासून बनवलेले असतात आणि त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अत्यंत धोकादायक आहे. त्यांचे दीर्घकाळ सेवन केल्याने रुग्णांचे खूप नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला स्नॅक्स खावेसे वाटत असेल तर प्रथम त्यांच्या पॅकेटमध्ये दिलेले कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाचा आणि अशा स्नॅक्सची निवड करा ज्यामध्ये कमी कार्ब आहेत. मधुमेही रुग्णांनी तेलकट स्नॅक्सऐवजी मूठभर काजू खाल्ल्यास त्यांची रक्तातील साखरही नियंत्रणात राहते आणि त्यांना अनेक पोषक तत्त्वेही मिळतात.
मद्य आणि शीतपेय सेवन
अल्कोहोलयुक्त पेये साखर आणि कार्बने भरलेली असतात. यामुळेच मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांना बीअर आणि वाईनचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टर विशेषत: मधुमेहाची औषधे घेत असलेल्या रुग्णांना मद्यपान टाळण्याचा सल्ला देतात कारण यामुळे हायपोग्लाइसेमिया (रक्तातील साखरेची अत्यधिक घट) होऊ शकते. दीर्घकाळापर्यंत हायपोग्लायसेमियाची समस्या धोकादायक असू शकते आणि त्यात एखाद्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.
फळांचा रस
फळांचा रस हा आरोग्यसाठी चांगला असला तरी त्यात साखरेची पातळी जास्त प्रमाणात असल्याने तो मधुमेहींसाठी खूप हानिकारक आहे. कोरड्या फळांप्रमाणेच फळांच्या रसातही भरपूर साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते. फळांच्या रसात जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण असतात, परंतु त्यात आढळणाऱ्या साखरेमुळे मधुमेहाच्या रुग्णांनी ज्यूसचे सेवन सावधगिरीने करावे.
सुकामेवा
आरोग्यसाठी सुकामेवा हितकारक असतो मात्र सुक्या मेव्यामध्ये साखरेचे प्रेमात अधिक असते. यामध्ये कार्बोहायड्रेट्सही भरपूर प्रमाणात आढळतात. उदाहरणार्थ, एका कप द्राक्षात 27 ग्रॅम कार्बोहायड्रेड असतात. तसेच एक कप मनुका मध्ये 115 ग्रॅम कार्ब्स आढळतात. मनुकामधील कार्बोहायड्रेट पातळी द्राक्षांपेक्षा तीन पटीने जास्त असते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. अशा स्थितीत मधुमेही रुग्णांनी लक्षात ठेवावे की, त्यांनी साखरेचे प्रमाण कमी असलेल्या सुक्यामेव्याचे सेवन करावे. बदाम, जर्दाळू, तुती आणि शेंगदाण्यांसह अनेक सुक्या मेव्यांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते आणि ते अनेक पोषक तत्वांनीही समृद्ध असतात.
तळलेले पदार्थ
तळलेले पदार्थ कॅलरींनी भरलेले असतात जे रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. हे पदार्थ प्रथम रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवतात आणि त्यात आढळणाऱ्या स्निग्ध पदार्थांना पचायला वेळ लागत असल्याने ते रक्तातील साखरेचे प्रमाण बराच काळ वाढवून ठेवतात. केवळ फॅट्सस नाही तर ते हानिकारक ट्रान्स फॅट (कुकीज, केक, पिझ्झा आणि बर्गर इत्यादींमध्ये आढळणारी चरबी) देखील समृद्ध असतात ज्यामुळे इतर अनेक रोगांचा धोका देखील वाढतो.