Diabetes Tips: आई-वडिलांपैकी एखाद्याला असेल डायबिटीस तर मुलांनी ‘या’ गोष्टींची काळजी घेणे आवश्यक
मधुमेहाचा धोका हा अनुवांशिक देखील असतो, म्हणजेच जर तुमच्या पालकांपैकी एकाला मधुमेह असेल तर तुम्हालाही तो होण्याचा धोका असू शकतो, अशा लोकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.
Diabetes Tips: मधुमेह आता घराघरात पोहोचला आहे. बहुतेकांच्या घरी कुटुंबात एकतरी डायबिटीस (Diabetes Causes) असतोच. मानसिक तणाव, खराब जीवनशैली, वाढती व्यसनाधीनता आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुण वयातच डायबिटीस होऊ लागला आहे. तज्ज्ञांनी मधुमेहाच्या समस्येचे वर्गीकरण हा गंभीर ‘सायलेंट किलर’ आजार म्हणून केला आहे, कारण त्यामुळे कालांतराने शरीरातील अनेक अवयवांचे नुकसान होऊ लागते. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंड, यकृत आणि डोळ्यांच्या समस्या सामान्य निर्माण होऊ लागतात (Diabetes Effect on body) . अशा समस्या टाळण्यासाठी. मधुमेहींना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपाय करत राहण्याचा सल्ला दिला जातो.
जीवनशैलीचा विशेष परिणाम
मधुमेहाचा धोका हा अनुवांशिक देखील असतो, म्हणजेच जर तुमच्या पालकांपैकी एकाला मधुमेह असेल तर तुम्हालाही तो होण्याचा धोका असू शकतो, अशा लोकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.
जर तुम्हालाही मधुमेहाचा अनुवांशिक धोका असेल, तर वेळीच प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करून तुम्ही भविष्यात या आजाराच्या धोक्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकता. जीवनशैलीतील विस्कळीतपणामुळे तरुणांमध्येही या गंभीर आजाराचा धोका वाढत असल्याने यापासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. चला जाणून घेऊया की जर तुम्हाला मधुमेहाचा अनुवांशिक धोका असेल तर या जोखमीपासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यावी?
बॉडी चेकअप करत राहणे आवश्यक आहे
मधुमेह हा प्रामुख्याने जीवनशैली आणि चयापचयशी संबंधित आजार म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला त्याचा अनुवांशिक धोका असेल तर जीवनशैली योग्य ठेवणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या जोखमीचे घटक जाणून घेऊन, दर सहा महिन्यांनी संपूर्ण शरीर तपासणी करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारची समस्या ती वाढण्यापूर्वी ओळखता येईल. असे केल्याने तुम्ही मधुमेहाचा धोका टाळू शकता. वार्षिक शारीरिक आणि डोळ्यांच्या तपासण्यांव्यतिरिक्त, वर्षातून दोन ते चार वेळा रक्तातल्या साखरेची तपासणी अवश्य करा.
आहाराकडे विशेष लक्ष द्या
मधुमेहाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने संतुलित आणि पौष्टिक आहार पाळणे महत्त्वाचे आहे. आहारात हिरव्या भाज्या, कारले, हंगामी फळे यांचा समावेश करा. साखरेचा वापर कमीत कमी करा, शक्य असल्यास ते टाळा. जेवणाच्या वेळा पाळा. थोडे थोडे खा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. कुठलाही उपाय करण्याआधी वैद्यकीय साला अवश्य घ्यावा)