Diabetes Tips : मधुमेहावर संजिवनीपेक्षा कमी नाही स्वयंपाक घरातील ही गोष्ट!
हे छोटे दाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे. मेथी दाणे नैसर्गिकरित्या मधुमेह नियंत्रणात (Diabetes Tips) ठेवण्यास मदत करतात. मेथीचे दाणे भारतीय स्वयंपाकघरात मसाला म्हणून वापरले जातात.
मुंबई : मधुमेह हा एक आजार आहे जो तुम्हाला आयुष्यभर सतावत असतो. आयुर्वेदिक पद्धतींनी हा आजार इतक्या प्रमाणात नियंत्रित केला जाऊ शकतो की तो पूर्णपणे बरा झाला आहे असे तुम्हाला वाटेल. परंतु बहुतेक जण आयुर्वेदिक उपचार आणि पथ्याचे पालन करत नाही. किचनमध्ये असलेले मसाले जेवणाला चविष्ट बनवण्यात आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यात मदत करतात. यामध्ये मेथीच्या दाण्यांचा समावेश आहे जे चव आणि आरोग्य दोन्हींसाठी परिणाम कारक आहे. हे छोटे दाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे. मेथी दाणे नैसर्गिकरित्या मधुमेह नियंत्रणात (Diabetes Tips) ठेवण्यास मदत करतात. मेथीचे दाणे भारतीय स्वयंपाकघरात मसाला म्हणून वापरले जातात, जे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते. मेथीच्या दाण्यांमध्ये विरघळणारे फायबर भरपूर असते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुणधर्म
या बियांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म पुरेशा प्रमाणात आढळतात. स्तनपान देणाऱ्या महिलांसाठीही मेथीचे दाणे फायदेशीर मानले जातात. याशिवाय ते पचनक्रिया सुधारतात आणि वजन कमी करण्यासही मदत करतात.
मेथीच्या दाण्यांना शतकांपासून प्रभावी घरगुती उपाय म्हणून वापरल्या जात आहेत. मेथीचे दाणेच नाही तर त्याची पाने देखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्णांनी रोजच्या आहारात मेथीच्या या छोट्या दाण्यांचा वापर केल्यास साखर सहज नियंत्रणात ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांच्या आहारात मेथीच्या दाण्यांचा समावेश कसा करायचा ते जाणून घेऊया.
मेथीचा चहा
हे करण्यासाठी एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात मेथीचे दाणे टाका. हे मिश्रण चांगले उकळून घ्या. आता ते गाळून त्यात लिंबाचा रस घाला. मग मेथीच्या चहाचा आस्वाद घ्या.
मेथीचे पाणी
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिऊ शकता. यामुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहते. यासाठी रात्री नियमितपणे एका भांड्यात 2 चमचे मेथीचे दाणे घ्या आणि त्यात पाणी घाला. रात्रभर भिजण्यासाठी सोडा. सकाळी गाळून प्या. जेवणाची चव वाढवण्यासाठी तुम्ही मेथीचे दाणे देखील वापरू शकता, जे जेवणाची चव वाढवते आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.