Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!

वजन कमी करण्यासाठी डाएट करताना केलेली थोडीशी चूकही आपले आरोग्य पूर्णपणे खराब करू शकते. डाएट करताना कमी जास्त प्रमाणात किंवा चुकीचा आहार घेतल्यास आरोग्यावर बरेच नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!
नवरात्रीच्या उपवासादरम्यान चुकूनही करु नका या चुका
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 2:08 PM

मुंबई : वजन कमी करण्यासाठी डाएट करताना केलेली थोडीशी चूकही आपले आरोग्य पूर्णपणे खराब करू शकते. डाएट करताना कमी जास्त प्रमाणात किंवा चुकीचा आहार घेतल्यास आरोग्यावर बरेच नकारात्मक परिणाम होऊ शकतात. अनेकदा आपल्या या आहारशैलीमुळे शरीराला त्रास होऊ शकतो. मात्र, काही लक्षणे दिसताच हे डाएटिंग त्वरित थांबवले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती लक्षणे आहेत, जी लोकांनी त्यांचा सुरु असलेला आहार त्वरित बंद केला पाहिजे…(Dieting Side Effects warning signs)

अ‍ॅसिडिटी

जर एखाद्या व्यक्तीला डाएटिंग दरम्यान अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवली असेल, तर त्यांनी त्यांचे डाएटिंग त्वरित बंद केले पाहिजेत. वास्तविक, आहार घेताना, लोक कमी-जास्त प्रमाणात अन्न खाण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे नंतर पोटात वेदना किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते.

तणाव जाणवणे

डाएट करणे म्हणजे उपासमार नसून आहारात संतुलन राखणे होय. कमी अन्नामुळे शरीराला चांगले पोषकद्रव्ये मिळत नाहीत आणि त्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होतो. जर, तुम्हालाही डाएटिंग दरम्यान चिडचिड किंवा ताण येत असेल, तर तुम्ही डाएट करणे लगेच थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

जास्त भूक लागणे

डाएटिंग सुरू केल्यानंतर तुम्हाला भूक लागण्याची काही समस्या असल्यास, आपला डाएट काही काळासाठी थांबवा. अन्यथा ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते.

अनियमित मासिक पाळी

आहार घेत असताना शरीराची चयापचय क्रिया कमी झाल्यामुळे शरीरातील हार्मोन्स बदलू लागतात. ज्यामुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळी दरम्यान अनियमितता येऊ शकते. आपल्याला अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ आपला डाएट आहार थांबवा.

थकवा

आहारादरम्यान आवश्यक पौष्टिक गोष्टींचा समावेश न केल्यामुळे आपण अशक्तपणा किंवा थकल्यासारखे वाटू लागले, तेव्हाही हा डाएट आहार घेणे त्वरित थांबवा (Dieting Side Effects warning signs).

डाएटिंगचे आणखी काही वाईट परिणाम :

कमकुवत स्नायू

डाएटिंग केल्याने आपल्या स्नायूंवरही खूप वाईट परिणाम होतो. द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कील विद्यापीठातील संशोधकांनी 32 निरोगी स्वयंसेवकांची निवड केली आणि तीन आठवड्यांसाठी त्यांचा आहार सरासरी 1300 कॅलरीने कमी केला. यावेळी तज्ज्ञांच्या लक्षात आले की, त्यांचे स्नायू कमकुवत होऊन वजन वाढू लागले आहे (Dieting side effects on human body).

मुतखड्याची समस्या

वजन कमी करण्यासाठी डाएटिंग केल्यामुळे शरीरात पौष्टिक घटकांचा अभावा निर्माण होतो. याचा शरीराच्या सर्व भागांवरही परिणाम होतो. हेल्थ अँड वेलनेस कोच व्हॅन बास्कर्क म्हणतात की, काही खाद्यपदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण अशा गोष्टींना आहारातून वगळतो, तेव्हा शरीर निर्जलीकरण होण्याचा धोका वाढू शकतो. डिहायड्रेशननंतर एखाद्या व्यक्तीस मूत्रपिंडातील दगड म्हणजे किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते.

कमकुवत हाडे

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वृद्धावस्थेतील लोक नियमितपणे उपवास करत असतील तर त्यांचे वजन त्वरित कमी होऊ शकते. मात्र, आपले वजन आधीपासूनच कमी असल्यास ही समस्या आणखी वाढू शकते. ब्रिघममधील वेलनेस विभागाचे प्रादेशिक संचालक कॅथी मॅकनस म्हणतात की, डाएटिंग करणे तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडे दोन्हीसाठी धोकादायक ठरू शकते.

(टीप : सदर माहिती ही संशोधनावर आधारित असून, कुठल्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Dieting Side Effects warning signs)

हेही वाचा :

Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल

Food Tips | आयुर्वेद सांगतंय मधासोबत ‘या’ गोष्टी खाऊ नका एकत्र, अन्यथा आरोग्याला होऊ शकते हानी!

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.