Pune Corona Update: हुश्शSS ! सुटलो एकदाचे, पुण्यात कोरोनाच्या शेवटच्या रुग्णालाही डिस्चार्ज, महामारीचं संकट अस्ताकडे

कोरोनाचा (Corona) संसर्ग महाराष्ट्रात (Maharashtra) कमी होत आहे. पुण्यात (Pune) महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या शेवटच्या रूग्णाचा काल डिस्चार्ज केला आहे. सध्या एकही कोरोनाचा रूग्ण पुण्यात उपचाराधीन नाही.

Pune Corona Update: हुश्शSS ! सुटलो एकदाचे, पुण्यात कोरोनाच्या शेवटच्या रुग्णालाही डिस्चार्ज, महामारीचं संकट अस्ताकडे
पुण्यात कोरोनाच्या शेवटच्या रूग्णाला डिस्चार्जImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 8:32 AM

पुणे – कोरोनाचा (Corona) संसर्ग महाराष्ट्रात (Maharashtra) कमी होत आहे. पुण्यात (Pune) महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या शेवटच्या रूग्णाचा काल डिस्चार्ज केला आहे. सध्या एकही कोरोनाचा रूग्ण पुण्यात उपचाराधीन नाही. तसेच ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ते रूग्ण त्यांच्या घरी होम क्वॉरंटाईनमध्ये उपचार घेत आहेत. सध्या पुण्यामध्ये कोरोनाचे 98 सक्रीय रूग्ण असून सर्वजण होम क्वॉरंटाईन आहेत. पुणे महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी अशी माहिती दिली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर राज्य सरकारकडून लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या लोकांच्यात एक उत्साह पाहायला मिळत आहे. दोनवर्षे लोकांनी कोरोनाच्या निर्बंधात काढल्याने लोकं तणावात होती.

पुणे शहरातील सरकारी रूग्णालयात एकही कोरोना रूग्ण नाही

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमधली सरकारी रूग्णालये कोरोनाच्या रूग्णांनी भरली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकांनी भीतीपोटी जीव सोडला. कोरोनाच्या काळात अनेक रूग्णांचा मृत्यू झाला. परंतु सध्या भारतात कोरोनाचा संसर्ग पुर्णपणे कमी झाला असून विपुल प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आहेत. पुण्यात कोरोना सुरू झाल्यानंतर अत्यंत भयावह परिस्थिती होती. लोकांना उपचारासाठी बेड मिळत नव्हते. परंतु सध्या कोरोनाचा एकही रूग्ण रूग्णालयात नाही. पुणे महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी अशी माहिती दिली आहे.

सध्याची पुण्यातील कोरोना स्थिती –  दिवसभरात रुग्णांना 01 डिस्चार्ज. –  पुणे शहरात करोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू, तर पुण्याबाहेरील 00,  एकूण मृत्यूः ०० –  एकूण मृत्यू – 9349 – आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 652498 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 1251

कोरोनाचे 98 सक्रीय रूग्ण असून सर्वजण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत

पुण्यात सध्या कोरोनाचे 98 सक्रीय रूग्ण असून त्यांची आरोग्यस्थिती बरी आहे. त्यामुळे त्यांच्यावरती घरीच उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाचे त्यांच्या संपर्कात असून त्यांची वेळोवेळी तपासणी करण्यात येत आहे. रूग्णसंख्या कमी झाल्याने लोकांची चिंता कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता पुण्यातील सगळ्या बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. लोक सुध्दा खरेदीसाठी आता घराच्या बाहेर पडू लागले आहेत.

Pune Video | पुण्यात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगची धिंड? म्होरक्यासह सात जणांच्या मुसक्या आवळल्या

‘पाकिस्तान अमेरिकेच्या कडेवरून उतरून रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे अमेरिकेचे पित्त खवळले असेल ?’, ‘सामना’तून इम्रान खानवरती टीका

ऑनलाईन कर्ज देणाऱ्या अ‍ॅपची न्यायालयाकडून गंभीर दखल, अ‍ॅपवर नियंत्रण कधी येणार? ‘आरबीआयला’ सवाल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.