तुम्हालाही आहे का High cholesterolची समस्या ? मग चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा….
खाण्यापिण्याशी संबंधित चुका केल्यानेही बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. रोजच्या आहारात खाल्ले जाणारे हे पदार्थ कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी विषासमान ठरु शकतात.
नवी दिल्ली – हिवाळ्याच्या दिवसात हाय कोलेस्ट्रॉलच्या (high cholesterol) रुग्णांची चिंता अधिक वाढते. कारण हवामानात सतत बदल होत असल्यामुळे रक्तातील लिपिड्सची पातळी सतत वर-खाली होत राहते. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी जितकी जास्त असेल तितका हृदयविकाराचा (heart disease) धोका जास्त असतो. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. त्याचे मुख्य कारण खराब कोलेस्ट्रॉलची (bad cholesterol) पातळी मानली जाते. तसेच, अखाण्यापिण्याशी संबंधित चुका केल्यानेही बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.
दररोज खाल्ले जाणारे हे पदार्थ कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी विषासमान ठरू शकतात. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया..
अंडं खाणं टाळा
एका रिपोर्टनुसार, हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी अंड्यापासून दूर रहावे. अनेक पोषक तत्वांनी युक्त असलेल्या या पदार्थामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आढळतात आणि ते जास्त प्रमाणात खाल्लं गेल्यास नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. बॅड कोलेस्ट्रॉल असणाऱ्या लोकांनी यकृत आणि हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अंडी खाऊ नयेत. ते खाण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
तळलेले पदार्थ
मसाले आणि तेल घालून बनवलेल्या पदार्थांची चव उत्कृष्ट असते पण ते पदार्थ सर्वांसाठी विषासारखे असतात. केवळ हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी तर सामान्य व्यक्तींनीही असे अन्नपदार्थ खाणे टाळावे. अशा खाद्यपदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. ज्या लोकांची कोलेस्टेरॉलची पातळी आधीच जास्त आहे, त्यांनी तळलेले अन्न खाणे टाळावे.
प्रक्रिया केलेले मांस
असे अन्न जास्त काळ साठवण्यासाठी वेगळ्या पद्धतीने तयार केले जाते. त्यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. याच कारणामुळे ते कमी प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मांसाहारी पदार्थांमध्येही कॅलरीज जास्त असतात आणि ते पदार्थ प्रमाणाबाहेर खाल्ल्यास शरीरात केवळ कोलेस्ट्रॉलच वाढत नाही तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.