Asthma | छातीत जडपणा, वारंवार धाप लागणे ‘अस्थमा’च्या ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!

बहुतेक लोकांना सर्दी किंवा ब्राँकायटिसमध्ये कफ किंवा कोरडा खोकला येतो. परंतु, ते देखील दम्याचे लक्षण देखील असू शकते.

Asthma | छातीत जडपणा, वारंवार धाप लागणे ‘अस्थमा’च्या ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
दम्याला अस्थमादेखील म्हणतात.
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 3:02 PM

मुंबई : तुम्हाला वारंवार धाप लागते का? किंवा थोड्याशा कामानंतरच आपल्याला शरीरात वेदना आणि छातीत जडपणाची समस्या येऊ लागते का? जर आपल्याला या समस्या येत असतील, तर सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे. कारण ही लक्षणे केवळ सामान्यच नाहीत, तर दम्याची देखील असू शकतात, म्हणूनच जर आपल्याला अधिक समस्या येत असतील, तर आपण ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. चला तर जाणून घेऊया दम्याची अर्थात अस्थमा या आजाराची काही प्राथमिक लक्षणे…(Do not ignore the Primary symptoms of asthma)

नेहमी कोरडा खोकला येणे

बहुतेक लोकांना सर्दी किंवा ब्राँकायटिसमध्ये कफ किंवा कोरडा खोकला येतो. परंतु, ते देखील दम्याचे लक्षण देखील असू शकते. हसल्यानंतर किंवा आडवे झोपल्यानंतर आपला खोकला आणखी वाढतो आणि हा खोकला आपल्या घशातून नव्हे, तर छातीमधून येतो. दम्याचा या प्रकारास ‘कफ अस्थमा’ म्हणतात.

वारंवार धाप लागणे

सतत धाप लागणे, श्वास लागणे किंवा सतत दीर्घ श्वास घ्यावा लागणे, किंवा सतत थकल्यासारखे वाटणे ही देखील दम्याची लक्षणे असू शकतात. दीर्घ किंवा खोल श्वासोच्छवासामुळे शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि कार्बन डाय ऑक्साईडही अधिक बाहेर पडतो. या तीन गोष्टी वायुमार्गामध्ये असंतुलनाचे कारण असू शकतात.

रात्रीच्या वेळी या समस्या वाढणे

जर, तुम्हाला कफ आणि खोकल्यामुळे झोप येत नसेल, तर ही एक गंभीर समस्या असू शकते. नीट झोप न लागल्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि त्याचा मानसिकरीत्याही परिणाम होतो. तीव्र निद्रानाश देखील हृदयरोग किंवा मधुमेहाच्या लक्षणांशी संबंधित आहे (Do not ignore the Primary symptoms of asthma).

छातीत जडपणा

छातीत जडपणा किंवा वेदना नेहमीच हृदयरोगामुळे होत नाही. हे देखील दम्याचे एक प्रमुख लक्षण असू शकते. छातीत जडपणामुळे दम्याचा झटका येऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, दम्याचा झटका आल्यामुळे एखाद्यास छातीत घट्टपणा, श्वास लागणे आणि खोकला जाणवू शकतो.

तीव्र श्वास

काही लोकांमध्ये तीव्र किंवा वेगाने श्वास घेणे दम्याचे लक्षण मानले जाते. अमेरिकेच्या क्लीव्हलँड क्लिनिकनुसार, प्रौढांसाठी सामान्य श्वास घेण्याचे दर प्रति मिनिट 12 ते 20 श्वास आहेत. आपण यापेक्षा वेगवान श्वास घेत असल्यास आपल्याला हायपरव्हेंटिलेशन देखील होऊ शकते.

कोणत्या कारणांमुळे होतो अस्थमा?

अस्थमाचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. कधी कधी हा आजार अनुवांशिक देखील असू शकतो. घरात कुणाला दम्याचा आजार असेल, तर अन्य सदस्यांना दमा होण्याची शक्यता असते. दमा होण्यासाठी अ‍ॅलर्जी प्रामुख्याने कारणीभूत ठरते. एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी असेल व त्या गोष्टीचा वारंवार संपर्क आला अथवा अ‍ॅलर्जी असलेल्या गोष्टींचे सेवन केले, तर रक्तातील काही घटक वाढतात. त्यातील ‘इसोनिओफिल’ नामक घटक वाढतो. त्यामुळे श्‍वासवाहिन्यांवर सूज येते.

सोबतच धुम्रपान, वायू प्रदूषण, धूळ, धूर, कॉस्मेटिक प्रोडक्ट आणि अगरबत्ती या सारख्या सुगंधित वस्तूंपासून देखील अस्थमा होऊ शकतो. काही अँटी-बायोटिक औषधे, दैनंदिन जीवनातील तणाव आणि सिगरेटची सवय देखील अस्थमा होण्याची संभावना वाढवते.

(टीप : वरील लक्षणे ही समान्य माहितीवर आधारित असून, कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)   

(Do not ignore the Primary symptoms of asthma)

हेही वाचा :

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.