मुंबई: आजच्या काळात बहुतांश लोक फिट राहण्यासाठी जिममध्ये जातात. गेल्या अनेक दिवसांपासून व्यायामा दरम्यान लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रकार दिसून येत आहेत. व्यायाम करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले की अचानक तुमच्या हृदयाचे कार्य थांबते, ज्यामुळे रुग्णाचा ताबडतोब मृत्यू होतो. व्यायामाच्या वेळी शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसून येतात, ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की वर्कआऊट करताना तुम्ही कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?
व्यायाम करताना छातीत दुखणे आणि अस्वस्थता असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण यामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा असे होते तेव्हा तुम्ही थोडा वेळ थांबा आणि हृदयाची धडधड नॉर्मल झाल्यावरच पुन्हा व्यायाम करा.
वर्कआऊट करताना जास्त थकवा जाणवत असेल तर ते हृदयाशी संबंधित समस्येचे लक्षण आहे. कारण कोलेस्टेरॉल मज्जातंतूंना ब्लॉक करण्याचे काम करते, ज्यामुळे रक्तदाबावरदेखील परिणाम होतो आणि आपल्याला थकवा जाणवू लागतो. त्यामुळे जर तुम्हाला जास्त थकवा येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
काही लोकांना व्यायाम करताना श्वास घेण्यास त्रास होतो, ही लक्षणे हृदयविकाराच्या झटक्याची समस्या देखील दर्शवतात. अशावेळी थांबा आणि 10 मिनिटांनंतर हलका व्यायाम करा.
व्यायाम करताना छातीत दुखत असेल तर त्याच वेळी व्यायाम थांबवावा. त्याचबरोबर जर तुम्हाला वारंवार अशी समस्या येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण ही एखादी समस्या असते तेव्हा तुम्हाला हार्ट अटॅक देखील येऊ शकतो.