कामातला फोकस होतोय कमी ? ‘या’ उपायांनी वाढवा तुमची एकाग्रता
तुम्हालाही रोजच्या जीवनात नीट फोकस करायला त्रास होत आहे का ? या छोट्या-छोट्या गोष्टी वापरून तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकता आणि आयुष्य सोपं करू शकता.
नवी दिल्ली : सध्याचं हे जग प्रचंड स्पर्धेचं असून या युगात मल्टीटास्किंग (Multi-tasking)आता आवश्यक आहे. परंतु आपल्यापैकी बहुतांश लोक असे आहेत, जे योग्यरित्या फोकस (focus) किंवा लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. या स्थितीत मल्टीटास्किंग तर दूरच एक गोष्टही नीट करणे अवघड होते. मनाप्रमाणे निकाल मिळत नाहीत आणि ऑफिस किंवा व्यवसायात कामाचा ताण (stress) वाढू लागतो. तुम्हालाही आयुष्यात या स्थितीचा सामना करावा लागत आहे का ? असं असेल तर या छोट्या-छोट्या गोष्टी वापरून तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकता आणि आयुष्य सोपे करू शकता.
संशयापासून दूर रहा
काम कितीही कठीण असलं तरी मी ते करू शकेन की नाही असा विचार करू नका. आपण व्यायाम करत असतो तेव्हा एक दिवस असा येतो जेव्हा कठीण व्यायामाचा दिवस असतो. मेहनत जास्त असल्यामुळे मी हे करू शकेन की नाही असा प्रश्न आपल्या मनात येऊ लागतो. पण व्यायाम केला की सगळं सोपं वाटतं. त्याचप्रमाणे, कोणतंही काम करण्यापूर्वी, स्वतःबद्दल चुकीचा विचार करणे, किंवा स्वत:च्या क्षमतेबद्दल संशय घेणे टाळा आणि हातातलं काम पूर्ण करण्याचा निर्धार करून योग्य प्रयत्न करत रहा.
घाई करू नका
कामाच्या दरम्यान, गोष्टी पटाटपट अथवा लवकर पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत सगळं चुकीचं होऊ शकतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट अथवा काम करताता, हळूहळू, शांतपणे केल्याने चुका कमी होतील व तुमचा आत्मविश्वासही वाढेल. मनोबल वाढल्याने तुम्ही नीट लक्ष केंद्रित करू शकाल. एकाग्रता वाढवण्यासाठी ही पद्धत खूप उपयुक्त आहे.
या गोष्टींपासून दूर राहा
मोबाईलमध्ये येणारे मेसेजेस, नोटिफिकेशन किंवा अशा अनेक गोष्टी आपले लक्ष विचलित करण्याचे काम करतात. कामाच्या दरम्यान, तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून लांब रहा. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींची किंवा कामाची यादी बनवा आणि त्या टाळण्यासाठी युक्तीचा वापर करा.
मेडिटेशन ठरते प्रभावी
योगासने किंवा मेडिटेशन केल्यामुळे आपली लक्ष केंद्रित करण्याची मर्यादा वाढते. मेडिटेनशचा व्यायाम म्हणजे लक्ष केंद्रित करणे आणि त्यामुळे तुम्ही त्याच्या मदतीने कामात लक्ष केंद्रित करू शकाल. मेडिटेशन करणे खूप सोपे आहे कारण तुम्ही ते कुठेही आणि कधीही करू शकता. निद्रानाश, तणाव यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्याही यामुळे संपुष्टात येतात.