तुम्ही पण तुमच्या मागच्या खिशात ‘पर्स’ ठेवता का? सावधान…पाठीच्या कण्यापासून शरीराच्या या भागांना होतेय नुकसान !
सारांश अनेक लोकांना पॅंटच्या मागच्या खिशात पर्स ठेवण्याची सवय असते. त्या पाकीटात पैश्यासह, क्रेडीड कार्ड, डेबीड कार्ड, पॅन कार्ड इत्यादी महत्वाची कार्डस् ही ठेवण्यात येतात. त्यामुळे पाकीट वजनदार होते. परंत, असे वजनी पाकीट मागच्या खिशात ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते हे तुम्हाला माहीत आहे का.
मुंबईः हौसेखातर किंवा गरज म्हणून म्हणा. आपल्यापैकी अनेक लोक पँटच्या मागच्या खिशात (In the back pocket of the pants) पैशांचे पाकीट (Wallet) ठेवतात. त्यात आणखी महत्त्वाचे असे की, पाकीटात पैसे असो नसो. पाकीट मात्र नेहमीच क्रेडीड कार्ड, डेबीड कार्ड, पॅन कार्ड ने भरलेले असते. असे जाडजूड पाकीट ठेवल्याने, मागील खिसाही फुगतो. पण, तुम्हाला माहिती आहे का? तुमची पाकीट ठेवण्याची हिच सवय तुम्हाला अत्यंत घातक ठरू शकते. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ही सवय तुमच्या शरीराला गंभीर इजा पोहोचवत असल्याचे समोर आले आहे. अशी जाडजूड पर्स मागच्या खिशात ठेवणे केवळ चोरीच्या दृष्टीनेच नाही तर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनेही खूप धोकादायक (Too dangerous) आहे. पर्स मागच्या खिशात ठेवण्याची ही सवय तुमच्या शरीराच्या अनेक भागांना इजा करत आहे. मग तुम्हाला माहित आहे का ही सवय इतकी धोकादायक का आहे…
पाठीसाठी घातक सवय
अनेकदा पुरुष त्यांची पर्स त्यांच्या जीन्स किंवा पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवतात आणि त्यांची पर्सही खूप जड असते. पण, तुम्हाला माहिती आहे का की असे करणे तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीला अशी सवय असेल तर ती ताबडतोब दुरुस्त करायला हवी. खरं तर, ही सवय तुमच्या पाठीसाठी आणि तुमच्या बसण्याच्या स्थितीसाठी खूप धोकादायक आहे. डॉ आर्नी अँग्रिस्ट यांनी हाफिंगेन सांगितले की, आपले पाकीट पँटमध्ये ज्या बाजूला असते त्या बाजूचे स्नायू दबले जातात. तसेच, पाकीट असल्यामुळे लोकांना बसताना तोल सावरता येत नाही. ते काहीसे एका बाजूला झुकून किंवा तिरके बसलेले असतात. असा वेळी मणक्याचे, कंबरेचे हाड तिरखे होण्याचा धोका वाढतो. अनेकदा तुमच्या खुबा, कंबर किंवा पाठदुखीचे कारण हे पँटमधील पाकीटही असू शकते. तुम्हाला जर अशा प्रकारचा त्रास जाणवत असेल तर, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लगेच सीटी स्कॅन करून घ्या. किरकोळ दुखण्याकडे केले जाणारे दुर्लक्ष हे महागात पडू शकते.
सांधेदुखीचाही धोका
याशिवाय पर्स मागे ठेवण्याच्या सवयीमुळे तात्पुरते दुखणे, झीज होणे आणि सायटिका इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सवयीमुळे ऑस्टियोआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही वाढतो. हे दीर्घकाळ करण्याआधी सांधेदुखी देखील होते. केवळ मोठ्या किंवा जाड पर्समुळेच नुकसान होते असे नाही. याशिवाय लहान पर्समुळेही सायटीकाचा त्रास वाढू शकतो. अहवालात डॉक्टरांनी सांगीतले आहे की, “जर तुम्ही तुमच्या पाकिटावर बसून 30 मिनिटे गाडी चालवली तर तुम्हाला पाठदुखी किंवा सायटॅटिक वेदनाची तक्रार होऊ शकते.” अशा स्थितीत नेहमी पर्स समोरच्या खिशात किंवा पिशवीत ठेवा.