तुम्ही केवळ फ्लेवर पाहून टूथपेस्ट खरेदी करता का ? पेस्टमध्ये कोणती गोष्ट आवश्यक आहे ते जाणून घ्या
दातांना स्वच्छ करण्यासाठी बाजारात अनेक कंपन्यांच्या टुथपेस्ट उपलब्ध आहेत. त्यापैकी अनेक कंपन्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या टुथपेस्टची जाहीरात करताना दिसतात. कोणत्या टुथपेस्टची निवड योग्य ?
दिल्ली : दातांची निगा राखणं, त्यांची रोजची सफाई करण्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या पसंतीच्या टुथपेस्टचा वापर करीत असतात. काही लोकांना जास्त फेस येणारी टुथपेस्ट ( toothpaste ) हवी असते. तर कोणी तिच्या गुणवत्तेला ( quality ) जास्त महत्व देतात. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या ( company ) टुथपेस्ट विक्रीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असते. मार्केटींग आणि जाहीरातीवर अनेक कोटी खर्च केले जातात. परंतू आपल्याला समजत नाही आपल्यासाठी कोणती टुथपेस्ट चांगली आहे. त्याचा फटका मग आपल्याला बसत असतो.
टुथपेस्ट विकत घेताना काय करावे ?
टेंन्टल तज्ज्ञांच्या मते टुथपेस्ट खरेदी करताना त्यांच्या ब्रॅंड आणि फ्लेवर एवजी त्याच्यात असलेल्या फ्लोराईडचे प्रमाण तपासले पाहिजे. ब्रिटीस डेंटीस्ट डॉ.खालीद कासिम यांच्या मते नागरिकांनी नहमीच फ्लाराईड युक्त पेस्टचा वापर केला पाहीजेत. कारण फ्लोराईडसच्या मुळेच दातांची घाण साफ होत असते. याचे कारण त्यात असलेले फ्लोराईड तत्व, कारण त्यामुळ दातांचे आतील आणि बाहेरील सफाई होते. यामुळे दांत चमकदार आणि स्वच्छ होतात. दातांना स्वच्छ करण्यासाठी बाजारात अनेक कंपन्यांच्या टुथपेस्ट उपलब्ध आहेत. त्यापैकी अनेक कंपन्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या टुथपेस्टची जाहीरात करताना दिसतात. त्यात लवंग तेल, कडुलिंब यासारख्या अनेक जडीबुडी असल्याचे दावे केले जात असतात.
लहान मुलांसाठी कमी फ्लोराईडची टुथपेस्ट द्या
लहान मुलांचे दांत नाजुक असतात. त्यामुळे त्यांना अशी टुथपेस्ट द्यावी ज्यात कमी फ्लोराइट वाली पेस्ट देण्यात यावी. डॉ. खालिद म्हणतात आणि मोठ्यांसाठी जास्त फ्लोराईडच्या टूथपेस्ट चालू शकतात. सर्वसाधारण पणे १३५० ते १५०० ppm फ्लोराईड वाली टुथपेस्ट चांगली. ती अधिक परिणाम कारक असते. परंतू लहान मुलांसाठी १००० ppm वाली पेस्ट देणे योग्य ठरते.
राख किंवा अन्य घटकांनी दांत साफ करणे चुकीचे
डेंटल तज्ज्ञांच्यामते जर तुमच्या दातांना जास्त धोका असेल तर तुम्ही ज्यादा फ्लोराईड वाली टुथपेस्ट वापरू शकता. डॉ. खालिद यांच्यामते खडबडीत राख किंवा तत्सम पदार्थांना दातांना पोहचते. यामुळे दात स्वच्छ होण्याऐवजी खराब होऊ शकतात. त्यामुळे टुथपेस्टने दांत स्वच्छ करण्यासाठी तुमच्या टुथपेस्टची क्वालीटीही चांगली हवी असेही ते म्हणाले.