Benefits Of Sleeping Early : रात्री उशीरापर्यंत जागणे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक, लवकर झोपल्यास मिळतात हे फायदे
जर तुम्हालाही रात्री उशीरापर्यंत जागं राहण्याची सवय असेल तर ती तत्काळ सोडा आणि लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : बदलती जीवनशैली आणि बिझी रूटीन (busy lifestyle) यामुळे आजकाल लोकांचं आयुष्य खूप फास्ट आणि व्यस्तही झालं आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर ना नीट जेवायला वेळ मिळतो आणि वेळेवर झोपणंही शक्य होत नाही. तसंच काही लोक असेही असतात, ज्यांना रात्री उशीरा झोपण्याची सवय असते. पण वेळेवर आणि लवकर झोपणं (Health Benefits Of Sleeping Early) हे आपल्या आरोग्यासाठी किती गरजेचं असतं हे तुम्हाला माहीत आहे का ?
खरंतर झोपण्याच्या चुकीच्या वेळेमुळे संपूर्ण आरोग्य बिघडू शकतं आणि आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे झोपण्याची योग्य वेळ कोणती (Best Time To Sleep) आणि त्याने काय फायदे होतात, हे जाणून घेणे खूप महत्वाचे ठरते.
वेळेवर झोपणे अतिशय महत्वाचे
नैसर्गिक सर्काडियन रिदमवर काम करण्यासाठी आपल्या शरीराची रचना केली गेली आहे आणि ते सूर्योदय ते सूर्यास्त याच्याशी ताळमेळ साधन कार्य करते. तसेच वेळेवर झोपल्याने झोपेचा हेल्दी पॅटर्न राखण्यास मदत होते. पण चुकीच्या वेळी झोपल्याने आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो. रात्री लवकर झोपण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घेऊया.
मानसिक आरोग्य चांगले राहते
झोपेच्या कमतरतेमुळे अनेक लोकांना चिंता आणि डिप्रेशनचा सामना करावा लागतो. पण वेळेवर, लवकर झोपण्याची सवय लावल्यास या समस्यांपासून सुटका होते. पुरेशी झोप घेतल्याने आपल्या मानसिक आरोग्यावर चांगला प्रभाव पडतो आणि स्ट्रेसही कमी होतो.
भूकेवर राहते नियंत्रण
जेव्हा आपल्याला चांगली आणि पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा आपले शरीर हे घ्रेलिन या भूकेच्या हार्मोनचे जास्त उत्पादन करते आणि लेप्टिन हार्मोनचे उत्पादन कमी होते. त्यामुळे सतत भूक लागून जास्त खाल्ले जाण्याचा तसेच वजन वाढण्याचाही धोका वाढतो. लवकर झोपलो आणि आणि पुरेशी झोप घेतली तर या हार्मोन्सवर नियंत्रण ठेवण्यास आणि सकस आहार खाण्याची चांगली सवय लागण्यास मदत होते.
शरीर ॲक्टिव्ह राहते
आपण वेळेवर झोपलो तर शरीर रिलॅक्स होण्यास आणि पुन्हा ताजेतवाने होण्यास पुरेसा वेळ मिळतो. यामुळे मूड चांगला राहतो, प्रोडक्टिव्हिटी वाढते तसेच शरीरही ॲक्टिव्ह राहते. तसेच पुरेशी झोप घेतल्यामुळे मधुमेह, हृदयाशी संबंधित आजार आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या निर्माण होण्याचा धोका रहात नाही.
हार्मोन्स कंट्रोलमध्ये राहतात
लवकर आणि वेळेवर झोपल्यामुळे शरीरातील हार्मोन्स कंट्रोल करण्यास मदत मिळते. विशेषत:स्ट्रेस हार्मोन्स. रात्री लवकर झोपल्याने संपूर्ण आरोग्यावर अतिशय चांगला परिणाम होतो.
इम्यून सिस्टीम मजबूत होते
रात्री चांगली झोप घेतल्याने शरीरात जास्त प्रमाणात पांढऱ्या रक्त पेशी निर्माण होण्यास मदत होते, जे इन्फेक्शन आणि आजारांशी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आपल्या शरीराचे विविध आजारांपासून संरक्षण होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)