Noise Pollution Effects on ears : सीटी बजाएं… तुमच्या कानातही वाजते का शिट्टी ? कारण माहीत्ये का ?
कानात शिट्टी वाजणे हे टिनिटस आजाराचे लक्षण असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. हे ध्वनी प्रदूषणामुळे होते. कोणताही मनुष्य 70 ते 80 डेसिबलपर्यंत आवाज ऐकू शकतो. त्यापेक्षा जास्त आवाज हा कानांसाठी धोकादायक मानला जातो.
नवी दिल्ली – तुम्हाला तुमच्या कानात कधी शिट्टी वाजल्यासारखा (whistle in ears) आवाज ऐकू येतो का? याचं उत्तर हो असेल तर आजच सावध व्हा. कारण हा एक प्रकारचा रोग असून , त्यावर वेळेवर योग्य उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा, तुम्हीही बहिरेपणाचे (deafness) शिकार होऊ शकता. कानात शिट्टी वाजण्याचे कारण म्हणजे टिनिटस रोग (Tinnitus), जो ध्वनी प्रदूषणामुळे (noise pollution) होतो. याबाबतीत एक संशोधनही समोर आले आहे असून, त्यानुसार, ट्रॅफिकच्या वाढत्या आवाजामुळे कानात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
डेन्मार्क युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यासंदर्भात केलेल्या संशोधनानुसार, ट्रॅफिकचा मोठा आवाज ऐकल्यामुळे लोकांना टिनिटसच्या आजाराचा सामना करावा लागतो. ज्यांची घरे वर्दळीच्या रस्त्यावर आहेत, त्या लोकांना हा त्रास सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. टिनिटसमुळे अनेक लोकांना कानात शिट्टीसारखा आवाज जाणवत आहे. ट्रॅफिकच्या मोठ्या आवाजामुळे टिनिटसची समस्या निर्माण होत असल्याचे संशोधनात सहभागी शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.
टिनिटस आजार म्हणजे काय ?
याबाबतीत कान, नाक, घसा तज्ज्ञांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की यासंदर्भात आधीही अनेक संशोधने करण्यात आली आहेत आणि ती योग्य आहेत. वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे अनेकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येला टिनिटस म्हणतात. टिनिटस म्हणजे कानात इतर कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा प्रतिध्वनी जाणवणे. काही व्यक्तींना यामध्ये कानात शिट्टी वाजल्यासारखा आवाज ऐकू येतो.
प्रत्येक मनुष्य हा 70 ते 80 डेसिबलपर्यंत आवाज ऐकू शकतो, मात्र त्यापेक्षा जास्त मोठा आवाज हा कानांसाठी धोकादायक मानला जातो. परंतु, गेल्या काही वर्षांत ध्वनी प्रदूषणात खूप वाढ झाली आहे. अनेक जण रस्त्यावर विनाकारण जोरात हॉर्न वाजवतात. त्यामुळे लोकांच्या समस्यांमध्ये आणि ध्वनी प्रदूषणातही वेगाने वाढ होत आहे. सतत वाजणारे हॉर्न्स, मोठा आवाज यामुळे आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो.काही लोकांना तर बहिरेपणाचाही सामना करावा लागतो. तसेच मोठ्या आवाजामुळे हृदयाचे ठोके वाढणे, हृदयाशी संबंधित आजार होणे, असा मोठा धोका असतो. जे लोक प्रवासात बराच वेळ घालवतात त्यांना टिनिटसचा धोका जास्त असतो. शहरी भागात आणि गर्दीच्या ठिकाणी राहणार्या लोकांनाही कानासंदर्भात त्रास होतो.
असा करा बचाव
या समस्येपासून वाचण्यासाठी तज्ज्ञांनी काही उपाय सांगितले आहेत. कॅब ड्रायव्हर, डिलिव्हरी बॉईज आणि ज्यांचे घर मुख्य रस्त्यावर किंवा गर्दीच्या ठिकाणापासून जवळ आहे अशा लोकांनी नियमितपणे कानांची तपासणी केली पाहिजे. यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या आहेत. ही चाचणी दर सहा महिन्यांनी एकदा करावी. कारण ध्वनी प्रदूषणामुळे कानांची ऐकण्याची क्षमता कमी होऊ लागते. या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास बहिरेपणा येण्याचा धोका असतो. म्हणूनच उच्च आवाज सहन कराव्या लागणाऱ्या (वर नमूद केलेल्या) लोकांनी कानांची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे.
तसेच मोठा आवाज सहन करावा लागण्याची जास्त जोखीम असलेल्या लोकांनी इअर मास्क लावणे आवश्यक आहे. यामुळे कानात मोठा आवाज येण्याचा धोका राहणार नाही. जर तुम्हाला कानात प्रतिध्वनी ऐकू येत असेल किंवा शिट्टीचा आवाज येत असेल तर अशा परिस्थितीत डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधा. असे न केल्यास ही समस्या भविष्यात गंभीर रूप धारण करू शकते.