प्रेग्नन्सीमध्ये वारंवार अँटीबायोटिक्स घेता का ? त्याचे दुष्परिणाम माहीत आहेत ना ?
गरोदरपणात अँटी-बायोटिक्सचे अतिसेवन केले किंवा ओव्हरडोस झाला तर पाचनतंत्र आणि इम्युनिटी यांच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काय नुकसान काय होते, हे जाणून घेऊया.
Antibiotics Overdose Side Effects : बॅक्टेरिया किंवा जीवाणूंमुळे होणारे इन्फेक्शन रोखण्यासाठी आणि रोगांवर उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक्सचा (Antibiotics ) वापर केला जातो. ती (अँटिबायोटिक्स) शरीरात जातात आणि जीवाणू एकतर पूर्णपणे नष्ट करतात किंवा त्यांची वाढ थांबवतात. खोकला, त्वचेचे इन्फेक्शन, दातांचे इन्फेक्शन, सायनस संसर्ग आणि मूत्रमार्गात इन्फेक्शन इत्यादींसाठी अँटिबायोटिक्सचा वापर केला जातो.
शरीराचे असे अनेक आजार अँटिबायोटिक्स घेतल्याने बरे होतात. परंतु त्यांचा अतिरेक किंवा ओव्हरडोस (Antibiotics overdose) हा आरोग्यासाठी हानिकारक असतो, विशेषतः गरोदरपणात ते त्रासदायक ठरू शकते. गरोदरपणात महिला UTI, त्वचा संक्रमण, घशातील संसर्ग किंवा इतर कोणत्याही समस्या बरे करण्यासाठी अँटीबायोटिक्स घेतात. पण जास्त प्रमाणात अँटिबायोटिक्स खाल्ल्याने गर्भवती महिलांच्या आरोग्याला हानी पोहोचते.
अँटीबायोटिक्सचे अतिसेवन केल्याने काय दुष्परिणाम होतात, हे जाणून घेऊया.
गरोदरपणात अँटीबायोटिक्स घेणे सुरक्षित आहे का ?
गर्भधारणा किंवा गरोदरपणा हा एक नाजूक टप्पा मानला जातो. या काळात गरोदर महिलेला आणि न जन्मलेल्या बाळाला अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कधीकधी ती गुंतागुंत बरं करण्यासाठी अँटीबायोटिक्सची आवश्यकता असते. काही इन्फेक्शन असे असते, की ते बरं होण्यासाठी स्वतः डॉक्टरच अँटीबायोटिक्सचा कोर्स पूर्ण करण्यास सांगतात. पण गरोदरपणात अँटिबायोटिक्सचा ओव्हरडोस हानीकारक असतो हे नाकारता येणार नाही.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्सचे सेवन करणे हे अतिशय नुकसान कारक ठरू शकते, त्यामुळे गरोदर महिलांनी ते करणे टाळावे. तसेच या काळात गरोदर महिलांनी ओव्हर-द-काऊंटर अँटीबायोटिक्सचे सेवनही करू नये.
गरोदरपणात जास्त अँटीबायोटिक्स घेण्याचे दुष्परिणाम
1) अँटिबायोटिक्सच्या अतिसेवनामुळे शरीरातील वाईट जीवाणूंसोबत चांगले बॅक्टेरियाही नष्ट होतात. हे चांगले बॅक्टेरिया शरीराला फंगल इन्फेक्शनपासून वाचवतात. अँटिबायोटिक्सच्या अतिवापराने फंगल इन्फेक्शन होऊ शकते.
2) अँटिबायोटिक्सच्या अतिसेवनाने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे तुम्ही सहजपणे आजारांना बळी पडू शकता.
3) अँटिबायोटिक्सचे अतिसेवन केल्यास गॅस्ट्रोइंटेस्टाइनल म्हणजेत आतड्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
4) ज्या महिलांना डायजेस्टिव साइड इफेक्ट्स होतात, त्यांनी अँटिबायोटिक्सचे अतिसेवन केल्यास पोटदुखी, उलट्या यासारख्या समस्या होऊ शकतात.
5) जास्त प्रमाणात अँटिबायोटिक्सचे सेवन केल्याने भूक न लागणे आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. काही अभ्यासांमध्ये असे सांगण्यात आले आहे की अँटिबायोटिक्सचे अतिसेवनामुळे बाळाच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.