नवी दिल्ली – गेल्या अनेक शतकांपासून बेकिंग सोड्याचा (use of baking soda) वापर केला जात आहे. इजिप्तमध्ये प्राचीन काळापासून लोक बेकिंग सोड्याचा वापर करताना दिसतात. त्याचे अनेक फायदेशीर गुणधर्म (benefits) आहेत. आणि सध्या आपल्याला दैनंदिन जीवनात बेकिंग सोडा वापरण्याचे 300 हून अधिक मार्ग आहेत. आपण सर्वजण आपल्या घरात बेकिंग सोडा वापरतो, पण तुम्ही तो फक्त स्वयंपाकासाठी ( in kitchen) वापरता का? तसं असेल तर बेकिंग सोड्याचा इतर कशासाठी वापर कला जातो ते जाणून घेऊया.
बेकिंग सोडा वापरण्याचे 15 उपयुक्त मार्ग :
1) नैसर्गिक दुर्गंधीनाशक
बेकिंग सोडा हे नैसर्गिक दुर्गंधीनाशक आहे. आजच्या लोकप्रिय डिओड्रंटसमध्ये (थोडं) ॲल्युमिनियम असतं जे काखेतील घामाच्या ग्लॅंड्सना घाम येण्यापासून थांबवते. मात्र काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की डिओड्रंटसमधील ॲल्युमिनियम हे कॅन्सर आणि अल्झायमर रोगासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे असा डिओड्रंट वापरण्याऐवजी बेकिंग सोडा वापरून पहा.
2) छातीत जळजळ
बेकिंग सोडा छातीत जळजळ दूर करण्यास मदत करतो. 8 औंस पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून प्यायले तर पोटातील ॲसिडचा त्रास कमी होऊन ॲसिड रिफ्लेक्समुळे होणारी छातीतील जळजळ कमी करू शकते.
3) डास चावणे
डास चावल्यावर होणारी जळजळ किंवा खाज थांबवण्याचा एक सोपा उपाय म्हणजे बेकिंग सोडा. पाण्यात बेकिंग सोडा घालून घट्ट पेस्ट बनवा आणि ती प्रभावित भागावर लावा. थोड्या वेळाने सूज आणि खाज कमी होईल.
4) स्क्रब
बेकिंग सोडा सुरकुत्या, ब्लॅकहेड्स आणि काळवंडलेली त्वचा सुधारू शकतो. तुमच्या नेहमीच्या फेशियल क्लिन्झरमध्ये एक चमचा बेकिंग सोडा घाला आणि पेस्ट तयार करा. नंतर ते त्वचेवर लावून मसाज करा, ज्यामुळे एक्सफोलिएशनला मदत होईल व त्वचा मऊ होईल.
5) केसांची वाढ
बेकिंग सोडा केसांची वाढ करण्यास मदत करतो. सामान्यतः यासाठी बेकिंग सोडा व्हिनेगरमध्ये मिसळला जातो. 3 भाग पाण्यात 1 भाग बेकिंग सोडा मिसळा. हे मिश्रण केसांना लावा आणि 1ते 3 मिनिटे ठेवा नंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा.
6) स्ट्रेच मार्क्स
बेकिंग सोडा हा नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे आणि त्यामुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातात, ज्यामुळे स्ट्रेच मार्क्स सहज कमी होतात. त्यासाठी एका वॉशक्लोथवर थोडासा बॉडीवॉश टाका व त्यात एक चमचा बेकिंग सोडा घाला. बेकिंग सोडा बॉडी वॉशमध्ये मिसळण्यासाठी कापड दुमडावे व नीट घासावे. मग स्क्रब करा .
7) तोंडाची दुर्गंधी घालवण्यास मदत
बेकिंग सोडा ॲसिडची पातळी संतुलित करू शकतो आणि हॅलिटोसिसचा उपचार आणि प्रतिबंध करण्यास मदत करतो. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा विरघळवून, त्या पाण्याने गुळण्या करा. तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास प्रभावी ठरेल.
8) खरबरीत त्वचा
बेकिंग सोडा हा अल्कधर्मी स्वभावाचा असतो जो चेहऱ्यावरील सेबम मऊ करण्यास मदत करतो. यामुळे छिद्र साफ होतात व उघडतात. त्यामुळे जास्तीचे तेल शोषून घेते जे छिद्र रोखण्यास मदत करते.
9) डाग
बेकिंग सोडा डाग काढून टाकू शकतो. त्यासाठी 1/4 कप पाण्यात बेकिंग सोडा घालून सामान्य रिमूव्हर बनवा. याने कपड्यांरील डाग निघण्यास मदत होते.
10) फ्रीजमधील वास घालवण्यास प्रभावी
बेकिंग सोडा त्याच्या अल्कधर्मी स्वभावामुळे गंध शोषून घेऊ शकतो आणि त्यामुळे ॲसिडचा गंध निष्प्रभ होऊ शकतो. फ्रीजमधील वास घालवण्यास हे उपयोगी ठरते.
11) दागिन्यांची स्वच्छता
तुमच्या चांदीचे दागिने काळवंडले असतील तर ते साफ करण्यासाठी बेकिंग सोडो उपयोगी ठरतो. त्यासाठी 1/4 कप बेकिंग सोडा आणि 2 चमचे पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा. ओलसर स्पंजने ही पेस्ट दागिन्यांवर लावून ते हलक्या हाताने घासा, नंतर पाण्याने स्वच्छ धुवा आणि कोरडे करा.
12) गळूवर प्रभावी
बेकिंग सोडा गळूवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे आणि ते साफ करण्यास मदत करते. तसेच अँटीबॅक्टेरिअल एजंट म्हणून कार्य करते.
13) सनबर्न
अंघोळीसाठी बादलीत गार पाणी घेऊन त्याता एक कप बेकिंग सोडा घाला. त्या पाण्याने अंघोळ केल्यास थंड वाटते व सनबर्नमुळे झालेला त्रास कमी होतो.
14) मटार व वाटाणे मऊ शिजवण्यास उपयोगी
बेकिंग सोडा मटार आणि बीन्स लवकर शिजवण्यासाठी मदत करू शकतो.
15) पांढरे दात
बेकिंग सोडा तुमच्या दातांवरील पृष्ठभागावरील डाग प्रभावीपणे काढून टाकतो आणि त्यांना अधिक पांढरे करतो. त्यामुळे अनेक टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा समाविष्ट असतो.