जबतक रहेगा समोसे में आलू… समोसा खाणं पडेल खूपच महागात ! होऊ शकतात 3 गंभीर आजार
एका समोशामध्ये सरासरी 231 कॅलरीज असतात. ज्यामध्ये फॅट, कार्ब आणि ट्रायग्लिसराइडही जास्त प्रमाणात असते. तर, एक समोसा तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक असू शकतो हे जाणून घेऊया.
नवी दिल्ली – समोसा खायला सर्वांनाच आवडतो. बटाट्याचा हा चटकमटक, चविष्ट पदार्थ पाहूनच आपल्या तोंडाला पाणी सुटते. पण हा समोसा खाताना जेवढा चविष्ट वाटतो तेवढाच तो आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. हो, हे खरं आहे. याचे मुख्य कारण असे की समोसामध्ये अशा दोन गोष्टी आढळतात (samosa) ज्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत वाईट असतात, त्या म्हणजे मैदा आणि बटाटा. आता पहिला पदार्थ म्हणजे मैदा, समोस्यामध्ये असलेला मैदा असतो शरीरातील साखर वाढवू शकतो. तर दुसरा पदार्थ म्हणजे बटाटा, जो सहज पचतो आणि त्यामुळे क्रेव्हिंग आणि लठ्ठपणा (obesity) वाढतो. बटाटा तळला गेल्यानंतर सेवन केल्याने वजन वाढू (weight gain) शकते. याशिवाय, हे तळलेले अन्न आहे जे शरीरात जळजळ वाढवू शकते आणि पचनसंस्थेवर देखील परिणाम करू शकते. त्याशिवाय ,समोसा खाल्याने शरीराचे बरेच नुकसान होते, त्याबद्दल जाणून घेऊया.
1) रक्तवाहिन्यांचे होते नुकसान
जर तुमच्या रक्तवाहिन्या निरोगी नसतील तर हृदयाला नुकसान सहन करावे लागू शकते. जेव्हा तुम्ही समोसा खाता तेव्हा त्यातील खराब चरबी, खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड तुमच्या रक्तवाहिन्यांना चिकटून राहतात. त्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होऊन हृदयावर दबाव पडतो. यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात.
2) हार्मोन्सचे आरोग्य बिघडते
आपण एक समोसा खाल्ल्यानंतर समाधान होत नाही, लगेच आपल्याला दुसरा समोसा खावासा वाटू शकतो. त्यामुळे जास्त समोसा खाल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो, तसेच तेलकट पदार्थांमुळे वजनही वाढू शकते. तसेच, समोशासारखा तिखट, चटकमटक पदार्थ खाल्यानंतर तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची तल्लफ येऊ शकते. खरंतर समोसा खाल्याने शरीरात इमोशनल ईटिंग आणि क्रेव्हिंग वाढते. यामुळे तुमचे हार्मोनल आरोग्य बिघडू शकते. म्हणूनच जास्त समोसा खाणे योग्य नाही.
3) मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशरसाठी कारणीभूत ठरतो
समोसे खाल्ल्याने मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशरसारखे जीवनशैलीचे आजार झपाट्याने वाढू शकतात. वास्तविक पाहता, समोसे हे आपल्या चयापचय कार्यात म्हणजेच मेटाबॉलिज्ममध्ये अडथळा आणतात. म्हणजेच, यामुळे तुमच्या पोटाचे मेटाबॉलिज्म ते साखरेचे मेटाबॉलिज्मपर्यंत अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मधुमेह आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. वेळीच याकडे पुरेसे लक्ष दिले नाही तर आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात व त्याचा त्रास वाढू शकतो.