पुरूषांपेक्षा महिलांना जास्त थंडी का वाजते माहित्ये ?

थंडीचा ऋतू असो किंवा मग कुठे एसी सुरू असो, पुरूषांच्या तुलनेत महिलांना जास्त थंडी वाजते. असे का होते, हे जाणून घेऊया.

पुरूषांपेक्षा महिलांना जास्त थंडी का वाजते माहित्ये ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 2:24 PM

नवी दिल्ली – जर आपण आजारी असू तेव्हा थंडी जाणवते किंवा गार वातावरणात थंडी (feeling cold) वाजते, हे कॉमन आहे. पण बहुतांश प्रकरणांत पुरूषांपेक्षा महिलांना (women feel colder than men) जास्त थंडी वाजते, हे तुम्हीही पाहिले असेल. मात्र असे का होते, याचा विचार कधी केला आहे का ? सहसा महिलांना नेहमीच जास्त थंडी जाणवते आणि त्यांना शाल, स्वेटर किंवा जॅकेटची (jacket) गरज असते.

का वाजते जास्त थंडी ?

याचं खरं उत्तर म्हणजे स्त्रियांचा मेटाबॉलिज्म रेट (चयापचय दर) कमी असतो. शरीरातील मेटाबॉलिज्ममुळे उर्जेचे उत्पादन होते, ज्यामध्ये उष्णतेचाही समावेश असतो. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तापमान हे 98.6 डिग्री इतकेच असते, तरीही पुरूषांना जास्त उकडतं. खरंतर पुरूषांमध्ये मसल मास जास्त असते, त्यामुळे उष्णतेचे उत्पादन देखील अधिक होते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे मसल मास कमी आणि मेटाबॉलिज्म रेटही कमी असल्याने त्यांना थंडी जास्त वाटते.

हे सुद्धा वाचा

योग्य तापमान किती ?

अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की स्त्रियांना खोलीचे तापमान 25 डिग्री पर्यंत आवडते, तर पुरुष 22 डिग्री तापमानाला प्राधान्य देतात. जर घरातील प्रत्येक व्यक्ती निरोगी असेल तर घराचे तापमान 18 डिग्रीपर्यंत ठेवता येते. परंतु जर घरात वृद्ध व्यक्ती किंवा लहान मुले असतील तर 20 डिग्री तापमान योग्य ठरते. तसेच चांगली झोप हवी असेल तर खोलीचे तापमान खूप थंड किंवा खूप गरम ठेऊ नये. झोपताना खोलीचे तापमान आरामदायक वाटेल असेच ठेवावे.

थंडीच्या दिवसांत घर उबदार ठेवणे गरजेचे असते. तर उन्हाळ्यात घर कसं गार राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे.

दरवेळेस थंडी वाजणे चांगले नाही

– जर तुम्हाला सतत थंडी वाजत असेल तर ते एखाद्या आजाराचे लक्षण देखील असू शकते. त्यामुळे खालील लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

– तुम्हाला सतत थरथर जाणवत असेल.

– खूप दिवसांपासून ताप असल्यास.

– नखं निळी पडली असतील तर

– त्वचा खूप कोरडी झाली असेल तर

अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांना भेटून योग्य औषधोपचार करावेत.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.