Cigarette ओढल्यामुळे खरचं मानसिक तणाव कमी होतो का? जाणून घ्या तज्ञांचे मत…
cigarette health effects: मानसिक ताण कमी करण्यासाठी लोक सिगारेटचा अवलंब करतात. सतत धूम्रपान केल्याने व्यसन लागते आणि काही लोक दिवसातून 5 ते 7 सिगारेट ओढतात, पण सिगारेट खरोखरच मानसिक ताण कमी करतात का? याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊया.

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक गोष्टींचा समावेश करणे महत्त्वाचे असते. तुमच्या आहारामध्ये प्रोटिन, फायबर आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश करणे गरजेचे असते. पंरतु आजकल धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आपल्या ऑफिसमधील ताण आणि आयुष्यातील वैयक्तिक ल समस्यांमुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडते. आजकाल ऑफिसमधील अनेकजण त्यांच्या मित्रांचे बघून ताण कमी करण्यासाठी सिगारेट पितात. परंतु सिगारेट प्यायल्यामुळे खरचं तुमचा मानसिक तणाव कमी होतो का? चला जाणून घेऊया सिगारेट पिण्याचे दुष्परिणाम.
सिगारेटमध्ये निकोटीन नावाचे घटक असते ज्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सिगारेट प्यायल्यामुळे तुमच्या मेंदूचे आरोग्य बिघडू शकते. सिगारेट प्यायल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये डोपामाइन या हार्मोनचा समावेश होतो. डोपामाइन या हार्मोनमुळे तुम्हाला आनंद आणि आराम मिळतो. परंतु हा आनंद काही क्षणासाठीचा असतो. सिगारेट प्यायल्यानंतर तुम्हाला काही वेळ चांगले वाटते परंतु जसं जसं तुमच्या शरीरातील निकोटीनचा प्रभाव कमी होतो. शरीरातील निकोटीनचा प्रभाव कमी झाल्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ लागता आणि मानसिक ताण वाढू लागतो.
सिगारेट प्यायल्यामुळे काही काळ बरे वाटते, परंतु ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. सिगारेट ओढण्याच्या सवयीमुळे हळूहळू मानसिक ताण वाढू शकतो. कारण निकोटीनचे दीर्घकाळ सेवन केल्याने शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे चिंता आणि नैराश्याची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. दीर्घकाळापासून धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला धूम्रपान सोडणे सोपे नसते, कारण सिगारेटमध्ये असलेले निकोटीन व्यसनाधीन बनते. जर एखाद्या व्यक्तीने ते सोडण्याचा प्रयत्न केला तर शरीरात निकोटीनची कमतरता निर्माण होते. यामुळे चिडचिड, राग आणि इतर अनेक लक्षणे दिसू लागतात. अशा परिस्थितीत, व्यक्ती इच्छा असूनही धूम्रपान सोडू शकत नाही. इतर औषधांच्या बाबतीतही असेच काहीसे घडते.
मानसिक ताण कमी करण्यासाठी काय करावे?
चालणे किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करा.
खोल श्वास घेण्याच्या व्यायामामुळे मानसिक ताण कमी होतो
झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा
चांगली झोप घ्या.
मित्र आणि कुटुंबासह गप्पा मारा