पायी चालल्याने शुगर लेव्हल कमी होते का ? काय म्हणतात अमेरिकन तज्ज्ञ

चालल्याने सर्वसाधारण लोकांना फायदा होत असतो. परंतू डायबिटीजच्या रूग्णांना चालल्याने नेमका काय फायदा होत असतो, पाहूयात

पायी चालल्याने शुगर लेव्हल कमी होते का ? काय म्हणतात अमेरिकन तज्ज्ञ
MORING WALKImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 5:23 PM

नवी दिल्ली : डायबिटीज ( DAIBETES ) हा आजार जगभरात वाढत आहे. आपल्या राहणीमान किंवा लाईफस्टाईलशी संबंधित हा आजार आहे. जे लोक अधिक हालचाल करतात त्यांना डायबिटीज आजारात कमी धोका असताे. या आजारात फास्टींग ब्लड शुगर लेव्हल  ( fasting sugar level )  पासून ते जेवणानंतरच्या शुगर लेव्हलवर लक्ष ठेवावे लागते. या मध्ये रक्तातील शुगर लेव्हलचे संतुलन कायम राखावे लागते. अशा स्थितीत डाएटींग सोडून चालण्याच्या व्यायामाद्वारे शुगरवर कितपत नियंत्रण ठेवता येत का ते पाहूयात….

डायबिटीज म्हणजे मधुमेहाच्या आजारात शरीरातील शुगरचे ज्वलन होणे महत्वाचे असते. त्यामुळे डायबिटीजच्या रूग्णांनी अधिकाधिक चालणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांना नक्कीच फायदा होत असतो. आपल्या शरीराची हालचाल झाल्याने आपल्याला उत्साही वाटायला लागते. शरीराची हालचाल करण्यासाठी रोज वेगाने चालल्यामुळे आपल्याला तरतरीत वाटून आपले वजनही कमी होण्यास मदत मिळते. आपण कमी कॅलरीचा आहार घ्यायला हवा परंतू स्नायूंचे नुकसान रोखण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार असावा. मात्र चालण्याने खरेच शुगर कमी होत असते का ? पाहूया विस्ताराने…

अमेरिकन डायबिटीज असोसिएशन

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते डायबिटीज रूग्णांनी सक्रिय रहाणे गरजेचे असते. जे लोक अधिक हालचाल करतात आणि सतत क्रियाशील राहतात त्यांना डायबिटीजचा सर्वात कमी धोका असतो. वास्तविक जेवढ्या वेगाने आपण चालता तेवढ्या वेगाने आपली शुगरची लेव्हल कमी होत जाते. वेगाने चालल्याने पेनक्रियाज पेशी वेगाने काम करण्यास चालना मिळते, चालल्याने शुगर मेटाबोलिज्ममध्ये वेग येते. आणि अन्नातील शर्करा वेगाने पचून रक्तातील तिची पातळी वाढण्यापासून संरक्षण मिळते. पायी चालल्याने आपल्या शरीरातील शुगरची पातळी कमी होण्यास मदत मिळत असते.

डायबिटीजमध्ये किती वेळ चालायला हवे

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते दररोज आपण दहा हजार पावले चालायला हवे, किंवा किमान अर्धा तास तरी चालायला हवे, तर शुगर लेव्हल कमी व्हायला मदत मिळेल. जर तुम्हाला अर्धा तास चालायला अडचण येत असेल तर दिवसभरात सकाळी, दुपारी आणि सायंकाळी दहा – दहा मिनिटे चालायला जा, यावेळी डाएट कंट्रोल करावे, ज्याला पचन करण्यासाठी जास्त चालावे लागते असा आहार कमी करावा, हलके फुलके जेवण करावे, अशा प्रकारे डायबिटीजच्या रूग्णांनी वेळात वेळ काढून चालायला हवे, आपल्या किती वेगात चालायचे आहे. याचा विचार आपण आपल्या प्रकृतीनूसार आपण करायला हवा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.