जखम लवकर भरत नाही ? केवळ मधुमेह नव्हे, या कारमांमुळेही होऊ शकतो हा त्रास

बऱ्याच वेळा शरीराला झालेली एखादी जखम भरायला खूप वेळ लागतो. ते गंभीर असू शकते.

जखम लवकर भरत नाही ? केवळ मधुमेह नव्हे, या कारमांमुळेही होऊ शकतो हा त्रास
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 9:24 AM

नवी दिल्ली – एखाद्या व्यक्तीला मधुमेह झाला असेल तर त्याच्या शरीराला झालेली जखम (wound) भरण्यास वेळ लागू शकतो. जखम भरण्यासा वेळ लागणे हे मधुमेहाचे लक्षणही असू शकते. पण मधुमेह (diabetes) नसतानाही जर तुमच्या शरीरावरील जखम भरण्यास सामान्य वेळेपेक्षा अधिक काळ लागत असेल तर त्याकडे गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे. काही परिस्थितीमध्ये हा त्रास झिंकच्या (zinc) कमतरतेमुळे होऊ शकतो. झिंक हे शरीरासाठी सर्वात आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती आणि पेशींच्या वाढीसाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जखमा भरण्यासाठी झिंकचीही गरज असते.

आपल्या शरीराला आहाराद्वारे दररोज झिंकची आवश्यकता असते. विविध वनस्पती आणि प्राणी-आधारित खाद्यपदार्थांमधून झिंक सहज मिळवता येते, पण काही लोकांच्या शरीरात झिंकची कमतरता असू शकते. शरीरात झिंकच्या कमतरतेमुळे केस गळणे, त्वचेचे विकार आणि कमी रोगप्रतिकारशक्ती अशी लक्षणे दिसून येतात. शरीरासाठी झिंकयुक्त आहार घेणे का आवश्यक आहे आणि ते कसे पूर्ण होऊ शकते, हे जाणून घेऊया.

शरीरासाठी झिंक आवश्यक

हे सुद्धा वाचा

झिंक हे एक ट्रेस मिनरल (खनिज) आहे, याचाच अर्थ शरीराला ते फक्त थोड्या प्रमाणात आवश्यक असते. डीएनए तयार करण्यासाठी, पेशी वाढवण्यासाठी, प्रथिने तयार करण्यासाठी, खराब झालेल्या ऊतींची दुरुस्ती करण्यासाठी आणि निरोगी रोगप्रतिकारक शक्तीसाठी झिंक आवश्यक असते. आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असणारे झिंक हे सर्वात महत्वाचे पोषक तत्व आहे.

शरीरातील झिंकच्या कमतरतेमुळे कोणत्या समस्यांचा धोका उद्भवतो ?

आपल्या शरीरात झिंकची कमतरता असेल तर त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, त्याची लक्षणे वेळीच ओळखणे आवश्यक असते. (नकळत) वजन कमी होणे, पटकन बरे न होणारे फोड, सतर्कता कमी होणे, वास आणि चव घेण्याची क्षमता कमी होणे, वारंवार जुलाब होणे, भूक न लागणे, केस गळणे आणि त्वचेच्या सतत उद्भवणाऱ्या समस्या, हे सर्व शरीरात झिंकची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते. झिंकच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्तीसंदर्भातही समस्या उद्भवू शकतात.

रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे झिंक

शरीरात झिंकची कमतरता असेल तर त्याचा रोगप्रतिकारक शक्तीवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. झिंक हा रोगप्रतिकारक पेशींच्या कार्यासाठी आणि सेल सिग्नलिंगसाठी एक आवश्यक घटक असतो, त्याच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक प्रतिक्रिया कमकुवत होऊ शकते. झिंक सप्लिमेंट्स रोगप्रतिकारक पेशींना उत्तेजित करतात आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात. ज्या लोकांमध्ये झिंकची कमतरता असते त्यांना वारंवार संसर्ग होण्याचा धोका असतो.

आहाराच्या माध्यमातून सहज पूर्ण करा झिंकची कमतरता

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, निरोगी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्याची सवय असेल तर ते दैनंदिन आरोग्यातील झिंकची कमतरता पूर्ण करण्यास सहाय्यक ठरते. यासाठी मांस, ॲव्होकॅडो, अंडी, भोपळ्याच्या बिया , ओट्स, पालक, मशरूम्स आणि नट्स यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. या प्रकारच्या आहाराच्या माध्यमातून शरीरासाठी झिंकची दैनंदिन गरज भागवता येऊ शकते.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.