उभं राहण्याचे हे फायदे माहीत आहेत का ? हृदयरोगाचा धोका होतो कमी
आपल्या सध्याची जीवनशैली अशी आहे की 24 तासांपैकी सुमारे 8 ते 9 तास लोक बसून राहतात, किंवा बसून काम करतात. बसल्यामुळे शारीरिक सक्रियता कमी होते.
नवी दिल्ली – ज्याप्रमाणे अन्न खाल्यामुळे आपल्या शरीराला विविध पोषक तत्वं मिळतात, संगीत ऐकल्याने मनाला आराम मिळतो, त्याप्रमाणेच व्यायामाचेही (exercise) आहे. व्यायाम केल्याने आपल्या शरीराला फायदा होतो, हे सर्वांनाच माहीत आहे. पण उभं राहिल्यानेही (standing) आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात, हे तुम्ही कधी ऐकलं आहे का ? आपल्यापैकी अनेक लोकांना याबद्दल पुरेशी माहिती नसेल, पण खरंतर उभं राहणं हाही एक प्रकारचा व्यायामच (benefits of standing) आहे. यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात.
आपल्या सध्याची जीवनशैली अशी आहे की 24 तासांपैकी सुमारे 8 ते 9 तास लोक बसून राहतात, किंवा बसून काम करतात. बसल्यामुळे शारीरिक सक्रियता कमी होते आणि त्यामुळे आजारांचा धोका वाढतो. उभं राहण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घेऊया.
हृदयरोगाचा धोका होतो कमी दिवसभर एकाच जागी बसून राहिल्यास लठ्ठपणा वाढू लागतो. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. उभं राहिल्याने किंवा उभं राहून काम केल्याने रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल आणि वजन नियंत्रित राहते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
चरबी जळते जेव्हा आपण उभे असतो तेव्हा आपला मेटाबॉलिज्मचा (चयापचय) दर योग्य राहतो. यामुळे आपले फॅट्स लवकर बर्न (चरबी) होते. मात्र सतत बसून राहिल्याने मेटाबॉलिज्मची गती कमी होते. यामुळे चरबी हळूहळू जळते आणि लठ्ठपणा देखील वाढू लागतो.
लठ्ठपणा कमी करण्यास ठरते सहाय्यक
बसून राहण्यापेक्षा उभं राहिल्याने शरीरातील कॅलरीज अधिक बर्न होतात. कारण आपण उभं राहतो तेव्हा स्नायूंचे कार्य सुरू राहते व हाही एकप्रकारचा व्यायाम होतो.
पाठदुखीपासून होते सुटका
जेव्हा तुम्ही एकाच स्थितीत अनेक तास बसून काम करता तेव्हा अनेकदा पाठदुखीचा त्रास होतो. उभं राहून काम केल्याने आपले स्नायू सक्रिय होतात, त्यामुळे काही वेळ उभं राहिल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)