उपाशी पोटी कोणते पदार्थ खाऊ नयेत? कोणते खावेत? जाणून घ्या

| Updated on: Feb 27, 2023 | 5:00 PM

आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही सकाळी उपाशी पोटी खाव्यात आणि खाऊ नयेत. उपाशी पोटी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत? त्यामध्ये आम्लयुक्त सर्व गोष्टी असतात.

उपाशी पोटी कोणते पदार्थ खाऊ नयेत? कोणते खावेत? जाणून घ्या
dont eat this
Image Credit source: Social Media
Follow us on

आपल्या आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे याची जाणीव आपल्या सर्वांनाच आहे. सगळं खायला एक ठराविक वेळ असते. परंतु आरोग्य तज्ञ काही गोष्टी विशेषत: उपाशी पोटी घेण्यास नकार देतात. आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही सकाळी उपाशी पोटी खाव्यात आणि खाऊ नयेत. उपाशी पोटी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत? त्यामध्ये आम्लयुक्त सर्व गोष्टी असतात. उपाशी पोटी आम्लयुक्त काहीही खाल्ल्याने पोटाच्या आतड्यांवर परिणाम होतो आणि संसर्ग होण्याचा धोका असतो.

उपाशी पोटी ‘या’ गोष्टी खाव्यात

अंडी

अंडी प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत आहेत आणि हा सकाळचा परिपूर्ण नाश्ता आहे. सकाळी अंडी खाल्ल्याने तुमचे पोट दिवसभर भरल्यासारखे वाटते आणि आपल्याला भरपूर ऊर्जा देखील मिळते.

पपई

पपई हा एक चांगला सुपर फूड आहे. प्रत्येक ऋतूत मिळणाऱ्या पपईचा तुम्ही आपल्या ब्रेकफास्टमध्ये समावेश करू शकता. हे आपले कोलेस्ट्रॉल कमी करते आणि हृदयरोग वाढण्यापासून प्रतिबंधित करते.

भिजवलेले बदाम

सकाळी उठताच सर्वप्रथम रिकाम्या पोटी 4 भिजवलेले बदाम खावे. ज्यामुळे आपल्याला आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. फायबर, ओमेगा -3 आणि ओमेगा -4 ॲसिडयुक्त बदाम रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी नेहमी रिकाम्या पोटी सेवन करावे. त्याचबरोबर बदामाची साल काढून त्याचे सेवन करावे, हे ही लक्षात ठेवावे.

ओट्स

जर आपल्याला कमी कॅलरी आणि उच्च पौष्टिक अन्न खायचे असेल तर ओटमील एक उत्तम स्नॅक आहे. तसेच वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

उपाशी पोटी काय खाऊ नये

कच्चे टोमॅटो

कच्चे टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु रिकाम्या पोटी कच्चे टोमॅटो खाणे हानिकारक ठरू शकते. टोमॅटोमध्ये असलेले अम्लीय गुणधर्म ज्यामुळे पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करणे टाळावे.

दही

दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु ते उपाशी पोटी खाऊ नये. यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते ज्यामुळे सकाळी दही खाल्ल्याने तुम्हाला आरोग्यासाठी खूप कमी फायदे मिळतात.

सोडा

सोड्यामध्ये उच्च दर्जाचे कार्बोनेट ॲसिड आढळते. जेव्हा ही गोष्ट पोटात असलेल्या अॅसिडमध्ये मिसळते तेव्हा पोटदुखीसारख्या समस्यांना जन्म देते. त्यामुळे सकाळच्या वेळी ते टाळावे.