Antibiotics In Cold: आजारी पडल्यास स्वत:च्या मनाने औषध घेणे टाळा, शरीरावर होतात घातक परिणाम
तापाचे 60 से 70 टक्के रुग्ण हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:हून औषधे घेण्यास सुरुवात करतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे शरीरातील धोकादायक जीवाणूंविरुद्ध लढण्याची क्षमताच नष्ट होते.
नवी दिल्ली – थंडीच्या दिवसांत अनेक लोकांना सर्दी, खोकला किंवा ताप (cold and flu) येण्याचा त्रास होतो. ही सामान्य समस्या असली तरी बरेच लोकं त्यामुळे त्रस्त आहेत. मात्र अनेक वेळा असे देखील दिसून येते की अशा समस्यांमध्ये लोक स्वत: घरीच औषधे (medicines) घेण्यास सुरुवात करतात. अँटिबायोटिक्सचा (antibiotics) वापर खूप वाढतो आहे. मात्र या सामान्य आजारांसाठी घेतलेल्या औषधांमुळे तुमच्या आरोग्याची किती हानी होते, हे तुम्हाला माहीत आहे का ?
अँटिबायोटिक्सच्या अतिसेवनाने शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते, त्यामुळे औषधांचा परिणामही थांबतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, व्हायरल तापाचे 60 से 70 टक्के रुग्ण हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:हून औषधे घेण्यास सुरुवात करतात. मात्र औषधांच्या अतिसेवनामुळे शरीरात बॅक्टेरियाशी लढण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे इतर कोणत्याही आजारावर योग्य उपचार करणे शक्य होत नाही. अँटिबायोटिक्सच्या अति वापरामुळे रेझिस्टंसची समस्या झपाट्याने वाढत आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत हा त्रास होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच साधा सर्दी -खोकला झाला असेल तर लोकांना अँटिबायोटिक्स न घेण्याचा सल्ला दिला जातो.
लिव्हरचे होते नुकसान
अँटिबायोटिक्स घेतल्यानेही शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात, असे डॉक्टर सांगतात. त्यांच्या अतिवापरामुळे लिव्हर आणि किडनीचे आजार होतात. पण शरीरावर होणारे त्याचे दुष्परिणाम आपल्याला फार उशिरा कळतात. या औषधांचा मुलांवरही गंभीर परिणाम होतो आणि त्यांना ॲलर्जीचा त्रास होतो. ही औषधे विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी देखील वापरली जातात. पण प्रत्यक्षात ती फक्त बॅक्टेरियापासून संरक्षणासाठी आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स कधीही घेऊ नये. कदाचित त्यामुळे होणारी हानी आपल्याला लगेच कळणार नाही पण ते शरीरासाठी निश्चितच चांगले नसते.
खोकला, सर्दी, घसादुखी यासाठी औषधे घेऊ नका
खोकला, सर्दी, घसादुखी अशा सामान्य समस्यांमध्येही लोक अँटिबायोटिक्सचे सेवन करतात, पण हे करून नये. हे आजार सामान्य असतात व काही दिवसात ते आपोआप बरे होतात. औषध घेतल्याने त्यांच्यावर विशेष परिणाम होत नाही, परंतु त्यामुळे शरीराला अपाय नक्कीच होतो.अँटिबायोटिक्सच्या अतीवापरामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होऊ लागते.