Weight loss: वजन कमी करायचे असेल तर रोज प्या ‘वेलचीचे पाणी’, जाणून घ्या फायदे
जेवणाचा विशेषत: गोड पदार्थांचा स्वाद वाढवायचा असेल तर वेलचीचा वापर केला जातो. मात्र वेलचीच्या मदतीने वजनही कमी करता येते, हे तुम्हाला माहीत आहे का ?
Cardamom Water To Reduce Belly Fat : वाढत्या कामामुळे आजकाल सर्वांची जीवनशैली (bad lifestyle) बदलली आहे. वेळीअवेळी जेवण, जंक फूडचे सेवन (Junk food), पुरेशी झोप न घेणे, सतत एका जागी बसून काम करणे, व्यायामाचा अभाव या सर्व गोष्टींचा शरीरावर परिणाम दिसून येतो. वजन तर वाढतेच पण अनेक आजारही शरीराला घेराव घालू लागतात. मग सुटलेले पोट कमी करण्यासाठी जीममध्ये घाम गाळायचा नाहीतर डाएटच्या नावाखाली उपाशी रहायचे, असे प्रकार केले जातात. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात, पण सर्वांनाच त्यात यश मिळते असे नाही. मात्र घरच्या घरी काही उपाय करून वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. जेवणाचा, चहाचा विशेषत: गोड पदार्थांचा स्वाद वाढवायचा असेल तर वेलचीचा (Cardamom) वापर केला. मात्र त्याच वेलचीच्या मदतीने वजनही (weight loss) कमी करता येऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का ?
गोड पदार्थांमध्ये हमखास वेलचीचा वापर केला जातो. वेलचीच्या सुवासामुळे भूक वाढते, माऊथ फ्रेशनर (मुखवास) म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो. त्याशिवाय चांगल्या पचनासाठीही वेलचीच्या सेवनाने मदत होते. वेलचीचा वापर करून वजन कमी कसे करता येते, ते वाचूया .
वजन कमी करायचे असेल तर वाढवा वेलचीचा वापर
हेल्थशॉट्सनुसार, वेलचीमुळे भूक तर वाढतेच पण तिच्या सेवनाने मेटाबॉलिज्मही वाढते. ज्यामुळे शरीरावर जमा झालेली चरबी कमी करणे सोपे होते. एवढेच नव्हे तर अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्या दूर करण्यासाठीही वेलचीचे सेवन फायदेशीर ठरते. रोज वेलचीचे पाणी प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करता येऊ शकते.
असे बनवा वेलचीचे पाणी
5 ते 6 वेलची घेऊन, त्या सोलून त्याचे दाणे बारीक कुटून पूड करून घ्या. आता अंदाजे एक लीटर पाण्यात वेलचीची पूड घालून ते रात्रभर तसेच भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी थोडे गरम करून घ्यावे व ते प्यावे. हे पाणी दिवसातून 2-3 वेळा प्यायल्यास शरीरावरील चरबी कमी होऊन, वजन कमी होण्यास मदत होते. मात्र त्यासोबतच तुम्हाला योग्य आहार आणि थोडाफार व्यायाम करण्याचीही गरज आहे.
वेलचीच्या पाण्याचे इतर फायदे –
- बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
- शरीरात रक्ताची गुठळी तयार होण्याचा आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
- रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
- मधुमेहाचा धोका कमी होतो.
- वेलचीचे पाणी प्यायल्यामुळे पचनसंस्थचे कार्य सुधारते व बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो.
- पोटदुखीचा त्रास होत असल्यास वेलचीचे पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
- वेलचीचे पाणी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य माहितीवर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. )