दररोज नारळ पाणी प्यायल्याने हे पाच आजार दूर होतात, ऑल सिझन होतो फायदा
नारळाचे पाणी म्हणजेच शहाळ्याचे पाणी नैसर्गिक वरदान असून नारळाच्या पाण्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास फायदा होतो. हे पाणी पोषक तत्वांनी पुरेपुर असल्याने तुमच्या त्वचेला, पोटाचे आरोग्य, पचनाला आणि हृदयाच्या आरोग्याला देखील वरदान आहे.
मुंबई | 16 डिसेंबर 2023 : दररोज शहाळ्याचं पाणी प्यायल्याचे अनेक फायदे असतात. नारळाचे पाणी पोषक तत्वांनी भरपूर असते. त्यास आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. नारळाचं पाणी एक खूप चांगले हायड्रेटिंग ड्रींक आहे. ज्यास जादाकरून उन्हाळ्यात पिण्यासाठी पसंती दिली जाते. परंतू नारळ पाणी प्रत्येक सिझनमध्ये पिण्यास उत्तम असते. कारण नारळपाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढत नाही. तर शरीराला पोषण देण्यासाठी अत्यंत उत्तम आहे.
जर तुम्ही एक आरोग्यदायी आणि ताज पेय पिऊ इच्छीता तर नारळपाण्यासारखं उत्तम ड्रींक नाही. युएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित 2015 च्या अभ्यास अहवालात हे रक्त शर्करेची पातळी देखील कमी करू शकते. यासाठी संशोधकांनी उंदरांवर प्रयोग केला होता. हे माणसासाठी देखील लागू आहे. नारळ पाणी पिण्याची पाच फायदे जाणून घेऊयात…
त्वचेचे आरोग्य जपते – नारळपाणी ड्रायड्रेटेड राखण्यासाठी मदत करते. यात एंटीऑक्सिडेंट असल्याने आपल्या फाईन लाइन्स आणि सुरकुत्यांना आवर घालण्यास मदत होते. एंटीऑक्सिडेंट तुमच्या त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचविते. या व्हिटामिन सी आणि ई देखील असते. जे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असते.
1 ) किडनी स्टोनपासून वाचवते –
किडनी स्टोन झाला असेल तर डॉक्टर आपल्याला खूप पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. अशा वेळी थोडे नारळ पाणी प्यायला हवे. त्याने युरीनला वारंवार येते. त्यामुळे किडनी स्टोन तयार होणाऱ्या खनिजांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे किडनी स्टोनला रोखण्यासाठी आणि त्याला संपविण्यासाठी याची मदत होते.
2 ) पचन क्रिया सुधारणे –
नारळ पाण्यात फायबर असते. जे पचन होण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. यात एंजाईम देखील असतात. ज्यामुळे अन्न पचते. यामुळे पोटाचे रोग दूर होतात.
4) इलेक्ट्रोलाइट संतुलन –
नारळ पाण्यात पोटॅशियम, सोडीयम आणि मॅग्नीशियम असते. हे महत्वपूर्ण इलेक्ट्रोलाईट्स शरीरातील द्रव संतुलन करण्यास मदत करतात. ज्यांना प्रचंड घाम येतो त्यांच्या नारळपाणी पिणे फायद्याचे असते.
5 ) रक्तदाब नियंत्रित –
ज्यांना उच्च रक्तदाब आहे, त्यांच्यासाठी नारळपाणी वरदान आहे. कारण नारळ पाण्यामुळे हाय पोटॅशियमच्या गुणधर्मामुळे सोडीयमचा प्रभाव कमी करून ते संतुलन करण्यास मदत करते.