Health Tips : काढा अधिक पिणे ठरु शकते हानीकारक, जाणून घ्या तोटे
बरेच लोक रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सीच्या गोळ्या खातात. परंतु अति गोळ्या खाणे आपणास हानी पोहचू शकते. (Drinking more kadha can be harmful, know the advantages and disadvantages)
मुंबई : कोरोनाचा वाढता धोका पाहता प्रत्येक जण आपापल्या परीने काळजी घेत आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय, आयुर्वेदिक औषधांचे सेवन करीत प्रत्येक जण कोरोनापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. विटासीन सी युक्त फळे खाणे, काढा पिणे अशा पदार्थांचे सेवन प्रत्येक जण करीत आहे. मात्र कोणत्याही गोष्टीचे अति सेवन हानिकारक ठरु शकते. विटामिन सी, काढा हे आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहे तितकेच त्याचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. घरगुती उपायांसह नियमित व्यायाम करणेही आवश्यक आहे. (Drinking more kadha can be harmful, know the advantages and disadvantages)
विटामिन-सी युक्त फळे खा
विटामिन-सी युक्त फळांचे नियमित सेवन करावे. हिरव्या भाज्या, आंबट फळे, अंकुरीत कडधान्ये, पपई दररोज खावे. यामुळे आपल्या शरीरातील विटमीन-सी ची कमतरता दूर होईल आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल.
व्हिटॅमिन-सीच्या गोळ्या खाणे टाळा
बरेच लोक रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सीच्या गोळ्या खातात. परंतु अति गोळ्या खाणे आपणास हानी पोहचू शकते.
– व्हिटॅमिन सीच्या गोळ्या खाताना वृद्ध, दम्याचे रुग्ण, मधुमेह आणि हृदय रोगाच्या रुग्णांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. – व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांचे अति सेवन टाळून आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा. – व्हिटॅमिन सीच्या स्वरूपात घेतलेले सप्लीमेंट हानिकारक ठरु शकते. त्यामुळे त्याचे अतिसेवन टाळावे. – व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांमुळे मूत्रपिंडातील स्टोन, अतिसार, ओटीपोटात वेदना आणि पेटके येऊ शकतात. – व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या घ्या.
काढ्याचे फायदे
आयुर्वेदात काढा पिणे अतिशय फायदेशीर मानले जाते. कोरोनाशी लढण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लोक अधिक काढा पित आहेत. काढा पिणे आपल्यासाठी फायदेशीर असले तरी उन्हाळ्यात अधिक काढा पिणे नुकसानदायी होऊ शकते. अधिक काढा प्यायल्याने पोटात जळजळ, नाक सुकणे किंवा नाकातून रक्त येणे आदि समस्या होऊ शकतात. गरमीमध्ये अधिक काढा प्यायल्यास गॅस, जळजळ आदि समस्या होऊ शकतात.
नियमित योगा करा
सकाळी लवकर उठून प्राणायम, श्वसनाचे व्यायाम करा. रिकाम्या पोटी भुजंगासन, सर्पासन करा. सकाळी आणि संध्याकाळी गरम पाण्यात लिंबू पिळून प्या. यामुळे शरीराला विटामिन सी मिळण्यासोबत गॅसची समस्याही दूर होईल. जेवल्यानंतर एक ते दोन तासांनी झोपावे. (Drinking more kadha can be harmful, know the advantages and disadvantages)
चार पोलीस अधिकाऱ्यांच्या थेट मुंबईबाहेर बदल्या, पोलीस दलात खळबळ#dilipwalsepatil #MaharashtraPolice #MumbaiPolice https://t.co/jzHutoFxvl
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 4, 2021
इतर बातम्या
Video | लॉकडाऊन असून विनाकारण रस्त्यावर, पोलिसांनी घडवली अशी अद्दल की व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
भारतातील 5G नेटवर्क टेस्टिंगवर बंदी घाला, सुप्रीम कोर्टात याचिका