तुम्हालाही आहे का जेवताना मध्येच पाणी पिण्याची सवय? होऊ शकतो ‘हा’ त्रास

पाणी प्यायल्यामुळे आपला अनेक आजारांपासून बचाव होतो. पण चुकीच्या वेळेस आणि चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास अनेक समस्याही उद्भवू शकतात. तुम्हालाही जेवताना किंवा काही खाताना मध्येच पाणी प्यायची सवय असेल त्यामुळे होणारे नुकसान जाणून घेऊया.

तुम्हालाही आहे का जेवताना मध्येच पाणी पिण्याची सवय? होऊ शकतो 'हा' त्रास
Follow us
| Updated on: Dec 26, 2022 | 12:22 PM

नवी दिल्ली – पाणी हे (water) आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने आपले शरीर हायड्रेटेड राहतेच, शिवाय आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. निरोगी राहण्यासाठी, डॉक्टर देखील पुरेसे पाणी पिण्याचा (drink enough water) सल्ला देतात. पण हेच पाणी काही वेळेस आपल्यासाठी हानिकारकही ठरू शकते. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल, पण चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे (drinking water incorrectly) हे आरोग्याला हानी पोहोचवू शकते.

खरंतर बऱ्याच लोकांना काही खाताना किंवा जेवताना मध्येच किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिण्यची सवय असते. मात्र याच सवयीमुळे अनेक त्रास होऊ शकता. तुम्हालाही अशी सवय असेल यामुळे काय नुकसान होते, हे जाणून घेऊया.

पचन क्रियेवर पडतो प्रभाव

हे सुद्धा वाचा

जेवताना किंवा नंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनावर परिणाम होतो. खरे तर आपण जेव्हा अन्न खातो, तेव्हाच पचनक्रिया सुरू होते. अशा परिस्थितीत जेवणाच्या मध्येच पाणी प्यायल्याने या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे एकतर अन्न पचायला बराच वेळ लागतो किंवा कधीकधी अन्न नीट पचत नाही.

वाढू शकते इन्सुलिनची पातळी

शरीरातील इन्सुलिन नावाचे हार्मोन स्वादुपिंडाद्वारे सोडले जाते. शरीरातील साखरेच्या प्रवाहात इन्सुलिनची महत्त्वाची भूमिका असते. पण जेवताना किंवा नंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. म्हणूनच जेवताना मध्येच पाण्याचे सेवन टाळणे चांगले ठरते.

ॲसिड रिफ्लेक्सचा त्रास होऊ शकतो

अन्नासोबतच पाणी प्यायल्याने ॲसिड रिफ्लेक्सची समस्या देखील उद्भवू शकते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, अन्न खाताना पाणी प्यायल्याने पोटात ॲसिडचे प्रमाण वाढते, त्यामुळे अनेक वेळा आंबट ढेकर येऊ लागतात. या समस्येलाच ॲसिड रिफ्लेक्स म्हणतात. एवढेच नाही तर जेवताना पाणी प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते.

वाढू शकते वजन

जेवता पाणी प्यायल्याने लठ्ठपणाचाही धोका संभवतो. खरंतर जेवताना पाणी प्यायल्याने पचनावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत अन्नाचे पचन नीट होत नाही, आणि जे अन्न पचत नाही त्यापासून तयार होणारे ग्लुकोज लठ्ठपणात बदलते. अशा परिस्थितीत जेवताना किंवा त्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील साखर तर वाढतेच पण वजनातही वाढ होऊ शकते.

पोषक तत्वांची कमतरता

जर तुम्हालाही जेवताना पाणी पिण्याची सवय असेल तर शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. अन्नातील पोषक तत्व शोषून घेणे हे आपल्या पचनसंस्थेचे काम असते. पण जेवताना मध्येच पाणी प्यायल्यास या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, त्यामुळे आपल्या शरीरात पोषक तत्वांचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.