कोरोनामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो परिणाम ? अभ्यासातून धक्कादायक खुलासा

कोरोना संसर्गानंतर पुरुषांच्या प्रजनन क्षमतेबद्दल जाणून घेण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये अभ्यास करण्यात आला. या अनुषंगाने भारतातही एक अभ्यास करण्यात आला. स्पर्म काऊंट (शुक्राणूंची संख्या) सामान्य नसल्यास, प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो.

कोरोनामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो परिणाम ? अभ्यासातून धक्कादायक खुलासा
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 10:07 AM

नवी दिल्ली – कोरोना संसर्गाचे (corona virus) आत्तापर्यंत अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत.  डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासात धक्कादायक खुलासा झाला आहे. या अभ्यासानुसार, कोरोना विषाणूचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर (impact on male fertility) परिणाम होतो. कोविड-19 मुळे वीर्याच्या गुणवत्तेवर (Semen Quality) परिणाम होतो. याचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. या अभ्यासादरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या पुरुषांची स्पर्म काउंट टेस्ट करण्यात आली, त्यातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले. कोरोना झाल्यानंतर सीमेन क्वालिटी पूर्वीसारखी राहत नाही. मात्र या अभ्यासात, स्पर्ममध्ये कोरोना विषाणू किंवा त्याचा अंश असल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.

पाटणा, दिल्ली आणि मंगलागिरी (आंध्र प्रदेश) येथील एम्सच्या तज्ज्ञांच्या पथकाने कोरोनाबाधित पुरुषांच्या प्रजनन क्षमतेचा अभ्यास केला होता. ऑक्टोबर 2020 ते एप्रिल 2021 या कालावधीदरम्यान पाटणा येथील एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या 19 ते 43 वयोगटातील 30 कोरोना संक्रमित पुरुषांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला. संसर्ग झाल्यानंतर लगेचच त्यांची पहिली स्पर्म काउंट टेस्ट करण्यात आली. तर दुसऱ्यांदा अडीच महिन्यांनी त्यांचे सीमेन (वीर्य) घेऊन त्याचे विश्लेषण करण्यात आले. या तपासणीमध्ये या पुरुषांच्या सीमेनमध्ये SARS-CoV-2 आढळले नाही, पण पहिल्या चाचणीत त्यांच्या सीमेनची(वीर्याची) क्वॉलिटी खूपच कमकुवत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पुन्हा जेव्हा त्यांच्या सीमेनचा नमुना तपासण्यात आला तेव्हाही ते पूर्वीच्या पातळीपर्यंत पोहोचू शकले नाही. स्पर्म्सची संख्या, स्पर्मचा आकार आणि स्पर्म मूव्हमेंट (हालचाल) या 3 पॅरामीटर्सच्या आधारे स्पर्म्सची गुणवत्ता तपासण्यात येते.

अहवालात काय म्हटले आहे ?

हे सुद्धा वाचा

क्यूरिअस जर्नल ऑफ मेडिकलमध्ये या अभ्यासाचा अहवाल प्रकाशित झाला होता. या अहवालानुसार, पहिल्या सॅम्पलिंगमध्ये 30 पैकी 12 (40 टक्के) पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या कमी असल्याचे आढळून आले. 10 आठवड्यांनंतर जेव्हा दुसरी चाचणी केली गेली तेव्हा 3 पुरुषांच्या सीमेनची क्वॉलिटी (दर्जा) खूपच कमकुवत असल्याचे आढळून आले. पहिल्या चाचणीत 30 पैकी 10 पुरुषांचे सीमेन वीर्य कमकुवत असल्याचे आढळून आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अभ्यासात सहभागी झालेल्या 30 पुरुषांपैकी 26 पुरुषांमध्ये सीमेनचा थिकनेस (जाडी), 29 पुरुषांच्या स्पर्मची संख्या आणि 22 पुरुषांच्या स्पर्मच्या हालचालीवर परिणाम झाल्याचे दिसून आले.

पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम

कोरोना संसर्गानंतर पुरुषांच्या प्रजनन क्षमतेबद्दल जाणून घेण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये अभ्यास करण्यात आला. या अनुषंगाने भारतातही एक अभ्यास करण्यात आला होता. स्पर्म काऊंट (शुक्राणूंची संख्या) सामान्य नसल्यास, प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये ते कमकुवत आढळले. कोरोना संसर्गाने संपूर्ण जग प्रभावित झाले. या धोकादायक विषाणूमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आणि लाखो लोकांचा मृत्यूही झाला.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.