मैने तुम्हे पेहचाना नहीं… कोविड-19 बाधित लोकांमध्ये दिसतायत नवी लक्षणं, चेहरा ओळखण्यात येत आहे अडचण !
दीर्घकाळ कोविडने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये काही लक्षणे दिसून येत असून त्यांना चेहरा ओळखण्यात अडचण येत आहे, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : ॲना (नाव बदलले आहे) हिला काही महिन्यांपूर्वी कोविड (covid) झाला होता. त्यावर उपचारही झाले. त्यानंतर काही महिन्यांनी तिने कुटुंबियांची भेट घेतली, मात्र तेव्हा तिला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याची पुष्टी झाली नाही. काही शास्त्रज्ञांनी तिला प्रश्न (questions) विचारले, तिची तपासणीही केली. त्यावेळी तिने सांगितले की तिला तिच्या वडिलांचा आवाज दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याद्वारे ऐकू येत होता. तिच्या समोर जो चेहरा (face) दिसत होता , तो तिच्या वडिलांचा नव्हताच मुळी !
मार्च 2020 मध्ये कोविड-19 संसर्ग होण्यापूर्वी, ॲना सर्वांचे चेहरे सामान्य पद्धतीने ओळखत होती. कोविडचा संसर्ग झाल्यानंतर काही दिवसांनी ती बरी होत होती. मात्र काही महिन्यांनी ती पुन्हा आजारी पडली. तेव्हापासून तिला लोकांचा चेहरा ओळखण्यात त्रास होत आहे. शास्त्रज्ञ याला फेस ब्लाइंडनेस (Face Blindness) असे म्हणतात. विज्ञानाच्या भाषेत याला प्रोसोपॅग्नोशिया (Prosopagnosia) असे म्हटले जाते. लाँग कोविडशी संबंधित मेंदूच्या समस्यांच्या यादीमध्ये ही (समस्या) जोडलेली आहे.
यानंतर शास्त्रज्ञांनी 50 हून अधिक लोकांचा अभ्यास केला. या सर्वांना दीर्घकाळ कोविड होता. त्यांनाही हा त्रास होत होता. त्या व्यक्ती इतरांचा चेहरा सहज ओळखू शकत नव्हते. या समस्येची सुरुवात त्यांना झालेल्या संसर्गापासूनच झाली होती. 28 वर्षीय ॲनाने सांगितले की तिला समोरचे चेहरे हे पाण्यासारखे, म्हणजे हलणारे आणि तरगंणारे दिसतात. ती एक आर्टिस्ट असून आता पेंटिंग बनवण्यासाठी तिला लोकांची मते घ्यावी लागते. जेणेकरून तिला पेंटिंग व्यवस्थित करता येईल.
स्मरणशक्तीच्या दोषामुळे लोक दिशाही विसरतात
डार्टमाउथ कॉलेजमधील न्यूरोसायकॉलॉजिस्ट मेरी लुईस केस्लर आणि ब्रॅड ड्यूचेन यांनी ॲनावर अनेक चाचण्या केल्या. त्यातून या गोष्टीची पुष्टी झाली की तिला चेहरा ओळखण्यात अडचण येत आहे. तिला एक विशेष प्रकारचा चेहरा स्मरणशक्तीचा दोष आहे. पण हा काही मोठा मुद्दा नाही. हळूहळू हा त्रास अथला समस्या बरी होऊ शकते. पण त्यामुळे ॲनाला दिशा भ्रम व्हायला लागला, ती भरकटायला लागली. तिला नेव्हिगेशनचा त्रास होऊ लागला. जे रस्ते तिला पाठ होते, ते शोधण्यासाठी तिला आता जीपीएसची मदत घ्यावी लागत आहे.
लाँग कोविडने ग्रस्त लोकांमध्ये दिसून आली नवीन लक्षणे
प्रोसोपॅग्नोशियामध्ये दिशेचा गोंधळ देखील सामान्य आहे. ब्रॅड ड्यूचेन म्हणाले की ॲनाच्या विस्मरणाने आणि दिशाभूलतेने आमचे लक्ष वेधून घेतले. कोविड-19 मुळे तिच्या मेंदूला काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत होते. किंवा यामुळे मानसिक विकासात एक प्रकारचा अडथळा येतो. कोरोनाची लागण झालेली असताना ॲनाला तिची वास घेण्याची आणि चव घेण्याची क्षमताही गमवावी लागली होती. पण बरी झाल्यानंतर काही महिन्यांनी ती पुन्हा आजारी पडली तेव्हा तिला चेहरा ओळखण्यात त्रास होऊ लागला. ती दिशा विसरायला लागली.
कोरोना दरम्यान ब्रेन स्ट्रोक ठरू शकतो कारणीभूत
थकवा, लक्ष न लागणे, ब्रेन फॉग वगैरे लाँग कोविडमध्ये सामान्य असतात. यासोबतच ॲनाला मायग्रेन आणि शरीराचे संतुलन बिघडण्याची समस्याही होती. कोरोनादरम्यान ब्रेन स्ट्रोकही होऊ शकतो, असाही संशोधकांचा विश्वास होता. कोरोना संसर्गामुळे देखील अशा समस्या उद्भवू शकतात याची ॲनावर केलेल्या अभ्यासामुळे पुष्टी झाली असे ब्रॅड ड्यूचेन यांनी सांगितले. म्हणूनच डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी याची काळजी घेतली पाहिजे. हा अभ्यास नुकताच कॉर्टेक्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.