आँखें भी होती है दिल की जुबां… तुमच्या डोळ्यांतून मिळतात हार्ट ॲटॅकचे संकेत ! वेळेवर करून घ्या उपचार

जगभरात अनेक लोकांना हृदयविकार असून ते त्याच्याशी लढा देताना दिसतात. अशा परिस्थितीत, तुम्ही त्याची सुरुवातीची लक्षणे आणि संकेत ओळखणे महत्वाचे ठरते.

आँखें भी होती है दिल की जुबां... तुमच्या डोळ्यांतून मिळतात हार्ट ॲटॅकचे संकेत ! वेळेवर करून घ्या उपचार
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 8:15 AM

नवी दिल्ली : एखादी व्यक्ती खरं बोलत्ये की खोटं हे ओळखायचं असेल तर त्याच्या डोळ्यांत पहावं.. कारण माणूस तोंडापेक्षा डोळ्यांतून जास्त बोलतो (eyes speaks) असं म्हटलं जातं. एकवेळ जीभ खोटं बोलू शकते, पण माणसाचे डोळे खोटे बोलू शकत नाहीत. काही प्रमाणात, हे आपल्या आरोग्याबद्दल देखील म्हटले जाऊ शकते. अनेकवेळा असे दिसून आले आहे की, तुमची तब्येत चांगली (health problems) नसते, तुम्ही दुर्लक्ष करत असलात तरी तुमचे डोळे ते लपवू शकत नाहीत. अनेक संशोधने आणि तज्ज्ञांनीही असा दावा केला आहे की डोळ्यांमध्ये अनेक खोल रहस्ये दडलेली असतात. आपले आरोग्य, जन्म, मृत्यू, आजारपण आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित अनेक रहस्ये डोळ्यात लपलेली असतात. जेव्हा आपण बरं नसताना डॉक्टरांकडे (doctor) जातो, तेव्हा डॉक्टरही टॉर्च घेऊन आपले डोळे तपासतात, हेही तुमच्या लक्षात आलंच असेल.

त्याचप्रमाणे हृदयात काही समस्या असतील तर त्याचा परिणाम डोळ्यांवरही दिसून येतो. माणसाचे हृदय ही त्याची जीवनरेखा असते. ते थांबले तर आपले जीवन थांबते. हृदय हे पंपिंग मशीन आहे. हृदय रक्त पंप करते. त्यानंतर संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह होतो. जेव्हा हृदय एखाद्या अडचणीत अडकते तेव्हा संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो. आणि त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर दिसून येतो. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या सांगण्यानुसार, हृदयाशी निगडीत आजारामुळे दरवर्षी सुमारे 1.79 कोटी लोकांचा मृत्यू होतो.

हे सुद्धा वाचा

हृदयाशी संबंधित काही आजार असेल तर त्याचे संकेत आपल्याला आपल्या डोळ्यांतून मिळू शकतात. त्याकडे वेळीच लक्ष देऊन उपचार करणे महत्वाचे ठरते.

ब्लड प्रेशर

‘युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो’च्या मते, हाय ब्लडप्रेशरमुळे रक्तदाब वाढतो. या स्थितीत रेटिनोपॅथी होऊ शकते. त्यामुळे डोळ्यांच्या नसांमध्ये रक्त जाते. त्यानंतर रक्त गोठण्यास सुरुवात होते. डोळ्यांच्या शिरा फुटू शकतात तसेच दृष्टीही जाऊ शकते.

रेटिना आकुंचन पावणे

या आजारात रेटिना कोरडे होण्यासोबतच तो आकुंचनही पावू लागते. त्यामुळे दृष्टी पूर्णपणे नष्ट होते.

मोतीबिंदू

हृदयाशी संबंधित आजारांमुळे डोळ्यांमध्ये मोतीबिंदू होऊ शकतो, असे अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे. मोतीबिंदूच्या ऑपरेशन दरम्यान हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघातामुळे मृत्यू होण्याचाही धोका संभवतो.

हृदयाच्या धमन्यांमध्ये प्लेक तयार होतो

जेव्हा हृदयाच्या धमन्यांमध्ये प्लेक जमा होण्यास सुरुवात होते, तेव्हा डोळ्यांपर्यंत पोहोचणारे रक्त कमी होते. यामुळे डोळयातील पडदा नष्ट होतो आणि त्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.