बुद्धी तल्लख बनवायची असेल तर रोज अंडी खा, अभ्यासकांचा दावा

| Updated on: Nov 17, 2024 | 8:23 PM

दररोज अंडी खाल्ल्याने आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढवते. खास करुन वाढत्या वयात जर आपल्या विस्मृतीचा आजार झाला असेल तर अंडी रोजच्या आहारात समाविष्ट करायलाच हवीत असे संशोधनात उघड झालेले आहे.

बुद्धी तल्लख बनवायची असेल तर रोज अंडी खा, अभ्यासकांचा दावा
Follow us on

जर तुम्हाला वाढत्या वया बरोबर आपली मेमरी चांगली राखायची असेल तर तुम्ही अंडी खाऊ शकता. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन डीएगोच्या संशोधकांनी एका अभ्यासात सांगितले की नियमित अंडी खाल्ल्याने आपल्या मेंदूचे कार्य योग्य प्रकारे होण्यास मदत होते. अंड्यात असलेली कोलीन, विटामिन्स B -6, B-12 आणि फॉलिक एसिड मेंदूचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.विशेषत: महिलांच्या मेंदूच्या आरोग्यासाठी अंडी खूपच लाभदायक असतात.

युसी सॅन दीएगोद्वारे केलेल्या अभ्यासात 55 वर्षांवरील 890 ज्येष्ठांचा समावेश केला गेला. त्यात 357 पुरुष आणि 533 महिला होत्या. या लोकांच्या मेंदू विषयक कार्यावर अंडी खाण्याचा काय प्रभाव होतो हे पाहीले गेले. चार वर्षे हा प्रयोग झाला. त्याचे रिझल्ट आश्चर्यकारक होते. ज्या महिला अधिक अंडी खात होत्या त्यांची व्हर्बल फ्लुएन्सी ( शब्दांचा योग्य आणि वेगाने उच्चार करण्याची क्षमता )चांगली होती. तसेच या महिलांना जनावरे, झाडे आणि अन्य वस्तूंची नावे सांगण्याची क्षमता अधिक होती. तर ज्या महिलांनी कमी किंवा अजिबात अंडी खाल्ली नाहीत.त्यांच्यात ही क्षमता कमी होती.

पुरुषांवर कमी प्रभाव

पुरुषांच्या बाबतीत मात्र अंडी सेवनाचा कोणताही विशेष स्वरुपातील प्रभाव त्यांच्या मेंदूवर झाला नाही. तरीही अंड्याचे सेवन कोणत्याही जेंडरवर वाईट परिणाम करीत नाही.हा निष्कर्ष महत्वपूर्ण आहे. कारण वाढत्या वया बरोबर व्यक्तीच्या मेंदूवर परिणाम होतो. विस्मृतीचा आजार या वयात अधिक तापदायक बनलेला असतो.

हे सुद्धा वाचा

रोज अंडी खाण्याचे फायदे

अंडी केवळ मेंदूसाठीच फायदेशीर नाहीत. तर महिलांच्या हाडांच्या मजबूतीसाठी देखील अंडी खाणे चांगले आहे.अंड्यात उच्च कोटीचे प्रोटीन असते. विटामिन्स B-12, फॉस्फरस आणि सेलेनियम देखील असते. जे शरीराच्या विविध क्रियांना सुधारण्यास मदत करते. ए,बी-12, आणि सेलेनियम इम्युन सिस्टीमला मजबूत बनविण्याचे कार्य करीत असते.